अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता. चार दिवसीय सराव सामना अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघ अॅडलेड येथे दाखल झाला आहे.
अॅडलेड येथे दाखल होताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. इशांत शर्मा आणि रिषभ पंत यांनीही काही फोटो शेअर केले आहेत.
अॅडलेड कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना पर्थ येथे 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न व सिडनी येथे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होतील. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही.