IND vs AUS T20 : रोहित शर्मापेक्षा कर्णधार म्हणून विराटच लई भारी!

India vs Australia : विराट कोहलीने हा सामना जिंकून रोहित शर्माला मागे टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:48 PM2018-11-26T12:48:44+5:302018-11-26T12:58:12+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia T20 : Virat kohli beat Rohit sharma as Captain's record | IND vs AUS T20 : रोहित शर्मापेक्षा कर्णधार म्हणून विराटच लई भारी!

IND vs AUS T20 : रोहित शर्मापेक्षा कर्णधार म्हणून विराटच लई भारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देविराट कोहलीच्या एका खेळीने मोडले दोन विक्रमसर्वाधिक ट्वेंटी20 विजय मिळवणारा दुसरा भारतीयमहेंद्रसिंग धोनी धावांच्या व विजयाच्या बाबतित अव्वल

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. कोहलीने नाबाद 61 धावांची खेळी साकारताना भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयाबरोबर भारताने मालिकाही 1-1 अशी बरोबरीत सोडवली. कोहलीने हा सामना जिंकून रोहित शर्माला मागे टाकले. कर्णधार म्हणून कोहली रोहितपेक्षा लई भारी ठरला आहे आणि त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम खुणावत आहे.

IND vsAUS T20 : विराटकोहलीची61 धावांचीखेळीठरलीविश्वविक्रमीhttps://t.co/YzlP30rKH0@imVkohli@BCCI#AUSvIND

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) November 26, 2018  

करो वा मरो अशा सामन्यात कृणाल पांड्याने चार विकेट घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने ऑस्ट्रेलियाला 164 धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 67 धावांची भागीदारी करून दिली. मात्र, मायकेल स्टार्स आणि अॅडम झम्पा यांनी दोघांना माघारी धाडले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने लोकेश राहुल व रिषभ पंत यांनाही त्वरित बाद केले, परंतु कोहली व दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 19.4 षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामार्तब केले. 

IND vsAUS : रिषभपंतव लोकेशराहुलयांनासंघाबाहेरकाढा, भारताच्यामाजीखेळाडूचीमागणीhttps://t.co/2mtWfHtehJ@BCCI@sanjaymanjrekar#AUSvIND

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) November 26, 2018  

या विजयाबरोबर कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आला आहे. तसेच सर्वाधिक ट्वेंटी-20 विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्येही त्याने रोहितला पिछाडीवर टाकले आहे. कोहलीने कर्णधार म्हणून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 510 धावा केल्या आहेत. त्याने रोहितचा 467 धावांचा विक्रम मोडला. तसेच सर्वाधिक विजयांमध्ये कोहलीने (12) रोहितचा 11 विजयांचा विक्रम मोडला. या दोन्ही विक्रमांत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानावर आहे. ट्वेंटी-20त कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 41 विजय आणि 1112 धावा आहेत. 


 

 

Web Title: India vs Australia T20 : Virat kohli beat Rohit sharma as Captain's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.