Join us  

India Vs Australia : टीम इंडियाच्या वन डे संघात महत्वाचा बदल, नव्या गोलंदाजाचा समावेश 

India Vs Australia : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) गोलंदाज सैनी याला IPL 2020मध्ये दुखापत झाली होती. तरीही त्याचा वन डे संघात समावेश केला गेला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 27, 2020 8:37 AM

Open in App
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला वन डे सामना आजनवदीप सैनीच्या दुखापतीनं तोंड वर काढलं

India Vs Australia :  भारतीय संघ तब्बत ८-९ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया रवाना होण्यापूर्वीपासूनच या मालिकेची सर्वांना उत्सुकता होती. त्यात ऑस्ट्रेलियासारख्या कट्टर प्रतिस्पर्धीसमोर खेळताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा 'जोश' आणखी वाढलेला पाहायला मिळतो. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला वन डे सामना तासाभरात सुरू होईल. भारतीय वेळेनुसार ९.१० मिनिटांनी या सामन्याचा पहिला चेंडू टाकला जाईल.  तत्पूर्वी, टीम इंडियानं वन डे संघात एक बदल केला आहे. वन डे संघात नवदीप सैनीला बॅक अप म्हणून टी नटराजनचा ( T Natarajan) समावेश करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) गोलंदाज सैनी याला IPL 2020मध्ये दुखापत झाली होती. तरीही त्याचा वन डे संघात समावेश केला गेला. त्याच्या पाठीच्या दुखातपीनं डोकं वर काढलं आहे आणि त्यामुळे बॅक अप म्हणून टी नटराजनचा वन डे संघात समावेश केला गेला आहे. निवड समितीनं गुरुवारी याबाबतची घोषणा केली.नटराजनचा संघर्षमय प्रवासटी नटराजननं चेन्नईच्या एका लहानशा गावातून आलेल्या या खेळाडूनं अथक परिश्रमाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली. त्याची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा हा परिवार. टी नटराजन याचा सनरायझर्स हैदराबादपर्यंतचा प्रवास आज सर्वांसमोर स्वतः त्यानेच उलगडला. SRHनं त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात नटराजनचा प्रवास ऐकून अनेकांना प्रेरणा नक्की मिळाली असेल. 2017मध्ये किंग्ल इलेव्हन पंजाबनं त्याला ३ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. परंतु तीन वर्षांत त्याच्या वाट्याला सहाच सामने आले. २०१८मध्ये हैदराबादनं त्याला आपल्या संघात घेतले.

भारतीय संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मायंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, टी नटराजन    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय