Join us  

India vs Australia : रवी शास्त्रींच्या एका विधानाने युवराज, रैनाचे स्वप्न भंगले

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी एक विधान केले. त्यामुळे युवराज सिंग आणि सुरेश रैनासह बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न भंग पावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:31 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाची एक पत्रकार परीषद झाली.या परीषदेला शास्त्री यांच्यासह भारताचा कर्णधार विराट कोहली उपस्थित होता.एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मात्र शास्त्रींनी असे एक विधान केले की, बऱ्याच क्रिकेटपटूंचे मन दुखावले गेले.

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर आगामी विश्वचषकासाठीही हा दौरा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी एक विधान केले. त्यामुळे युवराज सिंग आणि सुरेश रैनासह बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न भंग पावले आहे.

दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाची एक पत्रकार परीषद झाली. या परीषदेला शास्त्री यांच्यासह भारताचा कर्णधार विराट कोहली उपस्थित होता. यावेळी या दोघांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मात्र शास्त्रींनी असे एक विधान केले की, बऱ्याच क्रिकेटपटूंचे मन दुखावले गेले.

शास्त्री म्हणाले की, " ऑस्ट्रेलियाचा दौरा आमच्यासाठी महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर आगामी विश्वचषकही काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे आणि आता फार कमी एकदिवसीय सामने आम्हाला खेळायचे आहेत. त्यामुळे आम्ही संघात कोणतेही प्रयोग करणार नाही. आम्ही संघातील पंधरा खेळाडूंमध्ये कोणताही बदल करणार नाही. हेच पंधरा खेळाडू विश्वचषकासाठी कायम राहतील. "

शास्त्रींने असे विधान केल्यामुळे आता भारतीय संघात स्थान मिळणार नाही, हे युवराज, रैनासह काही खेळाडूंना समजून चुकले आहे. त्यामुळे विश्वचषकात आपल्याला संधी मिळणार नाही, हे या खेळाडूंना समजले आहे. त्यामुळेच विश्वचषकात खेळण्याचे या खेळाडूंचे स्वप्न भंग पावले आहे. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया