Join us  

India vs Australia ODI : शमी, कुलदीपचे पुनरागमन; रोहीत OUT राहुल IN? ऑसींविरुद्ध असा असेल भारताचा संघ

India vs Australia ODI: ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ वन डे मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 1:00 PM

Open in App
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेला शनिवारपासून सुरूवातमोहम्मद शमी, कुलदीप यादव यांचे वन डे मालिकेतून संघात पुनरागमनहार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संधी

हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ वन डे मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वन डे सामना शनिवारी हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी लोकेश राहुलला गवसलेला सूर ही आनंदाची बातमी आहे. पण, वन डे मालिकेत संघात मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे गोलंदाजीची बाजू बळकट करताना राहुलला पहिल्या वन डेत स्थान मिळेल का, याबाबतची उत्सुकता आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीची ही अखेरची वन डे मालिका असल्याने प्रत्येक खेळाडू मिळणाऱ्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहे. वन डे सामन्यात सलामीचा विचार केल्यास कर्णधार विराट कोहलीसमोर तीन पर्याय आहेत. मात्र, लोकेश राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला बसवण्याचा निर्णय कोहलीला घ्यावा लागणार आहे. राहुलला मधल्या फळीतही  विचार केला जाऊ शकतो, परंतू निवड समिती त्याचा तिसरा सलामीवीर म्हणून विचार करत आहे. त्यामुळे गवसलेला सूर लक्षात घेता त्याला पहिल्या वन डेत संधी मिळाल्यास कोणाला बाकावर बसावे लागेल, हे पाहावे लागेल. दिनेश कार्तिकचा वन डे संघात समावेश करण्यात आला नसल्याने रिषभ पंतचा दुसरा यष्टिरक्षक म्हणून विचार केला होईल. अंबाती रायुडू व केदार जाधव हे दोघेही त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे पंतला चौथ्या ते 7 व्या क्रमांकापैकी कोठेही खेळण्याची संधी मिळू शकते.ट्वेटी-20 मालिकेत उमेश यादव व सिद्धार्थ कौल यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. मोहम्मद शमीच्या पुनरागमनाने भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाला मोठा बूस्ट मिळाला आहे. उमेशचा वन डे संघात समावेश करण्यात आलेला नसल्याने सिद्धार्थला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. युजवेंद्र चहलला वन डे मालिकेत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाची साथ मिळू शकते. पण, वन डे सामन्यात युदवेंद्र आणि कुलदीप हीच पहिली पसंती असेल. जडेजाला काही सामन्यांत संधी मिळू शकते. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे विजय शंकरला या मालिकेत आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे.  भारताचा संभाव्य संघ : शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, अंबाती रायुडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मामोहम्मद शामीकुलदीप यादवविराट कोहलीलोकेश राहुलयुजवेंद्र चहल