Join us  

India vs Australia : धोनीच्या नावावर झाला 'हा' लाजीरवाणा विक्रम, होतोय ट्रोल...

धोनीला क्रिकेट चाहते ट्रोल करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 4:56 PM

Open in App

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : गेल्या वर्षाभरापासून महेंद्रसिंग धोनीने विश्वचषकात खेळावे की नाही, याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये धोनीने नेत्रदीपक कामगिरी केली होती. पण रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात धोनीच्या खेळीवरून आता त्याला काही जण ट्रोल करायला लागले आहेत. कारण या सामन्यात एम एस धोनीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

धोनी जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा भारताची 10 षटकांत 3 बाद 80 अशी स्थिती होती. उर्वरीत 10 षटकांमध्ये भारताने 80 धावा जरी केल्या असत्या तरी भारताला 180 धावा करता आल्या असत्या. पण अखेरच्या 10 षटकांमध्ये भारताला फक्त 46 धावाच करता आल्या. हेच पराभवाचे कारण ठरले आणि धोनीला त्यासाठीच क्रिकेट चाहते ट्रोल करताना दिसत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात 37 चेंडूंमध्ये प्रत्येकी एक चौकार आणि षटकारासह 29 धावा केल्या. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जास्त चेंडू खेळून कमी धावा करण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर होता. जडेजाने 35 चेंडूंत एका चौकारासह 25 धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनी जडेजपेक्षा दोन चेंडू जास्त खेळला. याेळी धोनीचा 78.37 असा स्ट्राइक रेट होता.

या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना 126 धावा केल्या होत्या. 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेला कोहलीनं या सामन्यात विक्रमासह कमबॅक केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया