Join us  

India vs Australia : अरेरे... मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर शिखर धवनचा उडाला त्रिफळा, पाहा भन्नाट यॉर्कर

India vs Australia, 1st T20I :जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरले.

By स्वदेश घाणेकर | Published: December 04, 2020 2:16 PM

Open in App

India vs Australia, 1st T20I : प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीला केवळ ११ धावाच जोडता आल्या. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या अफलातून यॉर्करनं गब्बरचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन ( १) माघारी परतला. त्यानंतर सातव्या षटकात मिचेल स्वेप्सननं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. स्वेप्सननं स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा ( ९) झेल टिपला. 

जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरले. संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळेल. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन अष्टपैलू खेळाडू संघात आहे. मोहम्मद शमी, टी नटराजन व दीपक चहर हे ३ जलदगती गोलंदाज असतील. 

ऑस्ट्रेलियाचा संघ  - अॅरोन फिंच, डी'आर्सी शॉर्ट, मॅथ्यू वेड, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईजेस हेन्रीक्स, सीन अॅबोट, मिचेल स्टार्कस मिचेल स्वेप्सन, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड

भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, मनीष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशिखर धवनविराट कोहली