सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. कसोटीचा कालचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. जबरदरस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराने केलेली शतकी खेळी, त्याला मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांच्याकडून मिळालेली सुरेख साथ यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 303 धावा फटकावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 130 आणि हनुमा विहारी 39 धावांवर खेळत होते. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी संपादन केली आहे. ही मालिका जिंकल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाचा मान आणखी उंचावणार आहे.
LIVE
Get Latest Updates
12:26 PM
दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया बिनबाद 24
11:34 AM
पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर, 622 धावांवर डाव घोषित
11:34 AM
रवींद्र जडेजा आऊट
11:30 AM
सुसाट... रिषभ पंतचे चौकारासह दीडशतक
11:27 AM
चौकारासह भारताच्या सहाशे धावा पूर्ण
10:38 AM
भारताच्या 6 बाद 533 धावा
10:26 AM
रिषभ पंतचं दमदार शतक, भारताच्या 500 धावा पूर्ण
09:48 AM
भारताच्या 6 बाद 491 धावा
09:35 AM
पंत व जडेजा मैदानावर
09:11 AM
रिषभ पंतचे अर्धशतक, भारताच्या 6 बाद 445 धावा
08:36 AM
भारताच्या 6 बाद 426 धावा
07:06 AM
उपहारापर्यंत भारताच्या 389 धावा
भारताच्या दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत पाच गड्यांच्या मोबदल्यात 389 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने शानदार खेळी करत 332 चेंडूत 181 धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंतने 42 चेंडूत 27 धावा केल्या आहे.
06:55 AM
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दमछाक
भारताच्या फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक होतान दिसत आहे. भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा कालपासून मैदानात टिकून आहे. चेतेश्वर पुजारा 175 धावांवर खेळत आहे, तर ऋषभ पंत 24 धावांवर खेळत आहे. भारताच्या 115 षटकांत 380 धावा झाल्या आहेत.
06:36 AM
भारताच्या पाच बाद 367 धावा
भारताच्या 110 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 367 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (168) आणि ऋषभ पंत (18) खेळत आहेत.
06:24 AM
ऑस्ट्रेलियाने एक रिव्ह्यू गमावला...
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ऋषभ पंतला झेलबाद ठरवण्यासाठी रिव्ह्यू मागितला. मात्र, पंत झेलबाद नसल्याचा निर्वाळा पंचांनी दिला.
06:13 AM
चेतेश्वर पुजाराच्या 160 धावा
चेतेश्वर पुजारा 160 धावा तर ऋषभ पंत सात धावांवर खेळत आहे. भारताच्या पाच बाद 345 धावा .
05:55 AM
चेतेश्वर पुजाराचे दीड शतक
दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने चांगली सुरुवात केली आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने दीड शतक पूर्ण केले आहे. भारताच्या 101 षटकांत चार बाद 329 धावा झाल्या आहेत.
05:55 AM
भारताला पाचवा धक्का
हनुमा विहारी 42 धावांवर बाद
05:38 AM
भारताच्या 98 षटकांत 315 धावा
दुसऱ्या डावात भारताच्या 98 षटकांत 315 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 139 धावांवर खेळत आहे, तर हनुमा 41 धावांवर खेळत आहे.