Join us  

IND vs AUS : कोहलीचं 'ते' विधान जसप्रीत बुमरानं जास्तच मनावर घेतलं

India vs Australia :ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील फलंदाजांना समज दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:26 PM

Open in App
ठळक मुद्देभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला ट्वेंटी-20 सामना बुधवारीविराट कोहलीसह फलंदाजांच्या कामगिरीवर लक्षगोलंदाजांकडूनही बऱ्याच अपेक्षा

ब्रिस्बेन, मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील फलंदाजांना जबाबदारीने फलंदाजी करा, अशी समज दिली होती.''आमची गोलंदाजी भेदक आहे. परदेशात आम्ही प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांमध्ये शकतो. पण फलंदाजांनी मात्र जबाबदारीने खेळ करायला हवा,'' असे कोहली म्हणाला होता. कोहलीचे हे विधान गोलंदाज जसप्रीत बुमराने जास्तच मनावर घेतलेलं पाहायला मिळाले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली ट्वेंटी-20 लढत बुधवारी होणार आहे. परदेशातील संघाची कामगिरी पाहता भारतीय खेळाडूंना सातत्यपूर्ण खेळ करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. विश्रांतीनंतर कोहलीही संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्यासह रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्वेंटी-20 मालिकेनंतर कसोटीतही भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी आतुर असणार आहे. पण, फलंदाजांची हाराकिरी हा भारतासाठो डोकेदुखीचा विषय ठरला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर कोहलीने भारतीय फलंदाजांना जबाबदारीने खेळण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीचा हा सल्ला बुमराने फार मनावर घेतला. त्याने सोमवारी नेटमध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. त्यात त्याने टोलेबाजीही केली.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीजसप्रित बुमराह