Join us  

India vs Australia : भारताच्या पहिल्या सामन्यात १२१ धावांचे रहस्य आहे तरी काय, वाचा आणि विचार करा...

भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा करता आल्या. पण भारताच्या या डावात १२१ धावांचे एक रहस्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 5:32 PM

Open in App
ठळक मुद्देहे रहस्य तुम्हाला माहिती आहे का...

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा करता आल्या. पण भारताच्या या डावात १२१ धावांचे एक रहस्य आहे. हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का...

भारताच्या रोहित शर्माने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण तो १० धावांवर बाद झाला. रोहित जेव्हा बाद झाला तेव्हा संघाच्या १३ धावा झाल्या होत्या. त्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. राहुल बाद झाल्यावर ही भागीदारी संपुष्टात आली. त्यावेळी भारताच्या झाल्या होत्या १३४ धावा. त्यामुळे धवन आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली होती.

राहुल बाद झाल्यावर भारतीय फलंदाज ठराविक फकराने बाद होत गेले. भारताची मधळी फळी तर यावेळी कुचकामी ठरल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे भारताला २५५ धावा करता आल्या. या सामन्यात एकेकाळी भारताची १ बाद १३४ अशी भक्कम स्थिती होती आणि भारतीय संघ सर्वबाद झाला २५५ धावांवर. हे जर गणित तुम्ही पाहिले तर भारताने आपले ९ फलंदाज १२१ धावांमध्येच गमावल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.

 

 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्माने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली, पण त्याला फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर धवन आणि राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. धवनने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावा केल्या. राहुलला यावेळी अर्धशतकासाठी तीन धावा कमी पडल्या.

राहुल आणि धवन दोन षटकांमध्ये बाद झाले आणि त्यानंतर भारताचा डाव चांगलाच गडगडला. कर्णधार विराट कोहली, मुंबईकर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद शमी आणि कुलदीप यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशिखर धवनलोकेश राहुल