Join us  

IND v AUS : कोहलीला डिवचू नका, अन्यथा..., आफ्रिकेच्या कर्णधाराने कांगारूंना दिली ताकीद

INDIA vs AUSTRALIA : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 3:28 PM

Open in App
ठळक मुद्दे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळणार

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी फार चांगली झालेली नाही. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदा इतिहास घडवेल अशी अनेकांना खात्री आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस यालाही तसेच वाटत आहे. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोहलीच्या क्रोधापासून वाचायचे असेल तर त्याला डिवचण्याची चुक करू नका, असा सल्ला ड्यू प्लेसिसने ऑसी खेळाडूंना दिला आहे. 

कोहलीला न डिवचणे ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचे ठरेल असे सांगून प्लेसिसने आफ्रिका संघाचे उदाहरण दिले. तो म्हणाला,''या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कसोटी मालिकेत आमच्या संघाने कोहलीला उगाच डिवचले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खेळाडू असतात ज्यांना स्लेजिंग फार आवडते. कोहलीही त्यापैकी एक आहे. प्रत्येक संघात असे एक-दोन खेळाडू असतात. त्यांच्याविरुद्ध खेळण्यापूर्वी आपण त्यांची चर्चाही करतो. पण, आम्ही अशा खेळाडूंना न डिवचण्याची रणनीती अवलंबतो.''

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्या मलिकेत कोहलीने 47.66 च्या सरासरीने 286 धावा केल्या होत्या.''कोहली अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्याविरोधात आम्ही कोणतीही शेरेबाजी केली नाही. तरीही त्याने धावा केल्याच. मग विचार करा त्याला डिवचल्यावर तो कसा खेळेल,''असा सवाल ड्यू प्लेसिसने केला. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली