Join us  

India vs Australia : भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळे रिषभ पंत अजूनही मुंबईत, संघ राजकोटला रवाना

दुसऱ्या सामन्यात पंत खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. पंत जर दुसऱ्या सामन्यात खेळणार नसेल तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 5:25 PM

Open in App
ठळक मुद्दे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतला दुखापत झाली होती.

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून अजूनही पंत मुंबईत डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. भारतीय संघ राजकोटला दुसऱ्या सामन्यासाठी रवाना झाला असून पंत अजूनही मुंबईत आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पंत खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. पंत जर दुसऱ्या सामन्यात खेळणार नसेल तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करत असताना एक चेंडू पंतच्या हॅल्मेटवर आदळला होता. यावेळी पंतला दुखापत झाल्याचे म्हटले गेले. सध्याच्या घडीला पंत हा डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत.

या सामन्यात जेव्हा लोकेश राहुल यष्टीरक्षणासाठी आला तेव्हा साऱ्यांनाच पंत कुठे आहे, हा प्रश्न पडला होता. पण गेल्या काही मिनिटांमध्येच पंत दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याच्याजागी राहुल हा यष्टीरक्षण करेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली होती. 

 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हीड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. धवन ( 74), विराट ( 16) आणि श्रेयस अय्यर ( 4) हे झटपट माघारी परतले. रिषभ पंत ( 28) आणि रवींद्र जडेजा ( 25) यांनी सावध खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी चतुराईनं भारताच्या धावांवर लगाम लावला. या जोडीनं नाबाद 258 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. वॉर्नरने 112 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 128, तर फिंचने 114 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 110 धावा केल्या.

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुल