Join us

Big Breaking : टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या खेळाडूंचे दुखापतींचे सत्र कायम असल्याचे दिसत आहे.  तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 5, 2021 09:32 IST

Open in App

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या खेळाडूंचे दुखापतींचे सत्र कायम असल्याचे दिसत आहे.  तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटी जिंकून  मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्या सामन्यात उमेश यादवला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यानंतर टीम इंडियाला बसलेला हा तिसरा मोठा धक्का होता. त्यात आणखी एकाची भर पडली. यावेळी टीम इंडियाचा फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) यानं माघार घेतली आहे. BCCIनं ही माहिती दिली.

सराव करताना राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाज बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्यानं या मालिकेतून माघार घेतली आहे आणि दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, असे बीसीसीआयनं सांगितले आहे.  आता तो मायदेशात परतणार असून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी दाखल होईल. 

भारतीय खेळाडूंचे माघार सत्र - भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त- इशांत शर्मा दुखापतग्रस्त- मोहम्मद शमी दुखापतग्रस्त- उमेश यादव दुखापतग्रस्त- लोकेश राहुल दुखापतग्रस्त- विराट कोहली पत्नीच्या बाळंतपणासाठी रजेवर

मोहम्मद शमी व उमेश यादव यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतल्याचे अखेर BCCIनं जाहीर केलं. या दोघांच्या जागी टी नटराजन ( T Natarajan) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांना स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माकडे उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिसऱ्या कसोटीत लोकेश राहुलच्या समावेशाची चर्चा सुरू होती, परंतु आता मयांक अग्रवालचे स्थान पक्के राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

असा असेल Playing XI -रोहित शर्मा ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे ( कर्णधार), रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलबीसीसीआय