Join us  

India vs Australia : मोठा धक्का; दुखापतीमुळे भारताचा महत्त्वाचा शिलेदार पहिल्या कसोटीला मुकणार

India vs Australia : रोहित शर्मा ( Rohit Sharma), इशांत शर्मा ( Ishant Sharma) हे दुखापतीतून सावरण्यासाठी BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) तंदुरुस्तीसाठी दाखल झाले आहेत. इशांतनं मालिकेतून माघार घेतली आहे, तर रोहितच्या सहभागाविषयी अजूनही अनिश्चितता आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 07, 2020 3:57 PM

Open in App
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरूचार सामन्यांच्या मालिकेत पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार

वन डे मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियानं ट्वेंटी-20 मालिकेत जबरदस्त कमबॅक केले. भारतानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची गाडी रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत टीम इंडियाला आधीच दुखापतग्रस्त खेळाडूंनी त्रस्त केले आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma), इशांत शर्मा ( Ishant Sharma) हे दुखापतीतून सावरण्यासाठी BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) तंदुरुस्तीसाठी दाखल झाले आहेत. इशांतनं मालिकेतून माघार घेतली आहे, तर रोहितच्या सहभागाविषयी अजूनही अनिश्चितता आहे. त्यात पहिल्या कसोटीतून आणखी एक खेळाडू खेळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

ट्वेंटी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja) दुखापतीमुळे पहिल्या डावानंतर सामना सोडावा लागला होता. concussion नियमानुसार त्याच्याजागी युजवेंद्र चहलला संधी मिळाली आणि त्यानं भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण, ३२ वर्षीय जडेजा पहिल्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुखापतीमुळे जडेजाला तीन आठवड्यांच्या सक्तिच्या विश्रांतीवर जावं लागणार आहे आणि त्यामुळे तो १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयनं अजून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

त्याची दुखापत तरीही बरी न झाल्यास २६ डिसेंबरपासूनच्या दुसऱ्या कसोटीलाही त्याला मुकावे लागू शकते. ''आयसीसीच्या concussion नियमानुसार डोक्याला झालेल्या दुखापतीनंतर खेळाडूला ७ ते १० दिवसांची विश्रांती सक्तिची आहे. त्यानुसार जडेजा आता ११ डिसेंबरपासूनच्या दुसऱ्या सराव सामन्यातही खेळणार नाही,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 

सराव सामने ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ  - डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माइशांत शर्मारवींद्र जडेजा