India vs Australia : ...अन् MCGच्या मानाच्या फलकावर पुन्हा झळकले अजिंक्य रहाणेचं नाव; पाहा गौरवास्पद Video 

India vs Australia : अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2020 01:34 PM2020-12-30T13:34:04+5:302020-12-30T13:34:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : Ajinkya Rahane has his name engraved on the MCG Honours Board for the second time, Watch Video | India vs Australia : ...अन् MCGच्या मानाच्या फलकावर पुन्हा झळकले अजिंक्य रहाणेचं नाव; पाहा गौरवास्पद Video 

India vs Australia : ...अन् MCGच्या मानाच्या फलकावर पुन्हा झळकले अजिंक्य रहाणेचं नाव; पाहा गौरवास्पद Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत इतिहास रचला. पहिल्या डावात ११२ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आलाअजिंक्यनं मेलबर्न कसोटीत १४७ धावांची खेळी केली होती

India vs Australia : अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत इतिहास रचला. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियाला एकमागून एक धक्के बसले. विराट कोहली मायदेशी परतला, मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादव जायबंदी झाला. तरीही अजिंक्य खचला नाही आणि त्यानं शतकी खेळीसह कल्पक नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले. पहिल्या डावात ११२ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा 'Mullagh Medal' नं सन्मान करण्यात आला आणि हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मेलबर्नवर शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्यनं पुन्हा एकदा त्याचे नाव MCGच्या मानाच्या फलकावर झळकावले. सर्व भारतीयांसाठीच्या या अभिमानास्पदाच्या क्षणाचा व्हिडीओ BCCIनं पोस्ट केला.

अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले. ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात विजयी धाव घेणारा अजिंक्य हा पाचवा परदेशी कर्णधार ठरला. यापूर्वी आर्थर श्रेव्स्बरी ( १८८४), अॅर्ची मॅकलॅऱेन ( १८९७), माईक ब्रेरली ( १९७९) व क्लाईव्ह लॉईड ( १९८२) यांनी अशी कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीनंतर कसोटीत विजयी धाव घेणारा अजिंक्य रहाणे हा पहिलाच कर्णधार. धोनीनं २०१३मध्ये दिल्ली कसोटीत विजयी धाव घेतली होती.


कसोटीत कर्णधार म्हणून पहिले तीनही सामने जिंकणारा अजिंक्य हा दुसरा भारतीय कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं सलग चार कसोटी सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियात भारतीय कर्णधारानं झळकावलेलं शतक विजयात महत्त्वाचे ठरल्याची ही पहिलीच वेळ. अजिंक्य रहाणेनं तो मान पटकावला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीत सलग दोन विजय मिळवणारा भारता हा दुसरा संघ. यापूर्वी इंग्लंडनं १९८२ व १९८६ मध्ये असा पराक्रम केला होता. २०१४मध्येही अजिंक्यनं मेलबर्न कसोटीत १४७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे MCG मानाच्या फलकावर दुसऱ्यांदा त्याचे नाव लिहिले गेले. 
पाहा तो अभिमानास्पद क्षण...

 

Web Title: India vs Australia : Ajinkya Rahane has his name engraved on the MCG Honours Board for the second time, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.