Join us

India vs Australia, 4th Test : टीम इंडियाला आणखी एक धक्का, दुखापतीमुळे गोलंदाजानं सोडलं मैदान

India vs Australia, 4th Test : दुखापत भारतीय गोलंदाजांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, लोकेश राहुल आदी खेळाडूंनी दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 15, 2021 10:14 IST

Open in App

India vs Australia, 4th Test : दुखापत भारतीय गोलंदाजांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, लोकेश राहुल आदी खेळाडूंनी दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यात हाताशी असलेल्या मोजक्या खेळाडूंमधून अंतिम ११ जणांची निवड करून टीम इंडिया चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. टीम इंडियानं आतापर्यंत या दौऱ्यावर २० खेळाडूंची चाचपणी केली. १९६०-६१नंतर प्रथमच टीम इंडियाला एखाद्या मालिकेत इतके खेळाडू खेळवावे लागले. आता अंतिम ११मधील गोलंदाजानंही दुखापतीमुळे मैदान सोडल्यानं अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) डोकेदुखी वाढली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मार्कस हॅरीससह डेव्हिड वॉर्नर सलामीला आला. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर या दोघांनी ऑसींच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. वॉर्नर पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर ९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ठाकूरनं ऑसींना दुसरा धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी ऑसींचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली. परंतु लंच ब्रेकनंतर वॉशिंग्टन सुंदरनं ( Washington Sunder) स्मिथला जाळ्यात ओढले. स्मिथ ३६ धावांवर बाद झाला. याही वेळेस रोहितनं सुरेख झेल टिपला.

पुढच्याच षटकात नवदीप सैनीच्या गोलंजावीर लाबुशेनही बाद झाला असता, परंतु अजिंक्यच्या हातून झेल सुटला. त्याचबरोबर सैनीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावे लागले. रोहितनं त्याचे षटक पूर्ण केले. BCCIची वैद्यकिय टीम सैनीच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे.

टीम इंडियाची Playing XI : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी नटराजन 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरोहित शर्मा