Join us  

India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता.

By स्वदेश घाणेकर | Published: January 17, 2021 7:43 AM

Open in App

India vs Australia, 4th Test Day 3 : भारतीय संघानं तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चतूर खेळ करताना चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) या दोन मुख्य खेळाडूंना तंबूत जाण्यास भाग पाडले. लंच ब्रेकला मोजकीच षटकं शिल्लक असताना रहाणेनं त्याची विकेट फेकली. दोन वेळा जीवदाना मिळूनही अजिंक्यकडून तिच चूक झाली आणि ऑस्ट्रेलियाला मोठं यश मिळालं. अजिंक्यच्या विकेटचं महत्त्व ऑसी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनाही चांगलेच माहित होते आणि म्हणूनच त्याला माघारी जाताना पाहून त्यांनाही प्रचंड आनंद झालेला दिसला.

तिसऱ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे, परंतु पहिल्या सत्रात त्याने त्रास दिलेला नाही. पुजारा व अजिंक्य यांनी संयमी सुरुवात करताना ४५ धावा जोडल्या आणि संघाच्या फलकावर १०५ धावा असताना टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाचा पहिला धक्का बसला. चेतेश्वर पुजारा ९४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीनं २५ धावा करून जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी अजिंक्यला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन जीवदान मिळाले. 

स्टार्कनं टाकलेला चेंडू अजिंक्यच्या बॅटला एज लागून गल्लीच्या दिशेनं गेला, सुदैवानं तेथे फिल्डर नसल्यानं त्याला चौकार मिळाले. पण, ५५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. मॅथ्यू वेडनं कॅच घेत अजिंक्यला माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्य ९३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीनं ३७ धावांवर माघारी परतला. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियानं ४ बाद १६१ धावा केल्या आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा