India vs Australia, 4th Test Day 3 : प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सहज लोटांगण घालणाऱ्या भारताच्या शेपटानं आज कांगारूंना चांगलेच झोडले. आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतले तेव्हा टीम इंडिया १८३ धावांनी पिछाडीवर होता. तळाच्या पाच खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर ( पदार्पणवीर), शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व टी नटराजन ( पदार्पणवीर) या नवख्या गोलंदांचा समावेश होता. त्यामुळे हे शेपूट गुंडाळून टीम इंडियाला सहज बॅकफूटवर पाठवू असा आत्मविश्वास ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात दिसला. पण, वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ऑसींचा आत्मविश्वास फाजील ठरवला. वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!
India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!
India vs Australia, 4th Test : भारताच्या अखेरच्या चार विकेट्सनं जोडल्या १५० धावा
By स्वदेश घाणेकर | Updated: January 17, 2021 12:33 IST
India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!
ठळक मुद्देशार्दूल ठाकूर- वॉशिंग्टन सुंदर यांची वैयक्तिक अर्धशतकासह १२३ धावांची भागीदारीटीम इंडियाचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले होते, पण...भारताच्या अखेरच्या चार विकेट्सनं जोडल्या १५० धावा