मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मोहालीमध्ये सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी एक विक्रम केला आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि शिखर हे या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारताची कोणती सलामीवीराची जोडी आहे, तुम्हाला माहिती आहे का...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार आहेत. या सामन्यासह मालिका जिंकण्याचा विराट प्लॅन टीम इंडियाचा असणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आजचा सामना रंगत आहे.
भारताकडून सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम सचिन आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी 8227 धावा केल्या होत्या. या सामन्यात जेव्हा शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा त्याने रोहितसह 4227 धावा केल्या होत्या.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणारी भारतीय जोडी
8227 सचिन तेंडुलकर - सौरव गांगुली
4427 रोहित शर्मा - शिखर धवन (50*)
4387 सचिन तेंडुलकर - वीरेंद्र सहवाग
4332 राहुल द्रविड - सौरव गांगुली
4328 रोहित शर्मा - विराट कोहली