Join us  

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला ४३ वर्षांनंतर इतिहास घडवण्याची संधी; ७ जानेवारीनं जुळवून आणलाय योगायोग!

India vs Australia, 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 06, 2021 3:18 PM

Open in App

India vs Australia, 3rd Test : मेलबर्न कसोटी विजयानंतर टीम इंडियाचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियानं सूत्रांचा हवाला देताना भारतीय खेळाडूंनी बायो-बबल नियमांचे उल्लंघन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळे BCCI आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात तणावाचे वातावरणही निर्माण झाले. पण, मैदानाबाहेरील या चर्चांकडे दुर्लक्ष करून टीम इंडिया सिडनी कसोटी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. BCCIनं तिसऱ्या कसोटीसाठी गुरुवारी संघ ( Playing XI) जाहीर केला. या कसोटीत बाजी मारून अजिंक्यला ४३ वर्षांनंतर इतिहास घडवण्याची संधी आहे. त्यासाठी तारखेचं गणितही जुळून आलं आहे.  

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचे पुनरागमन झाले आहे, तर नवदीप सैनीला ( Navdeep Saini) पदार्पणाची संधी दिली आहे. मयांक अग्रवालला संघाबाहेर बसवण्यात आले असून शुबमन गिल ( Shubhaman Gill) रोहितसह सलामीला येणार आहे. खराब कामगिरी करूनही हनुमा विहारीनं संघातील स्थान कायम राखले आहे. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे विहारीला आणखी एक संधी मिळाली आहे. उमेश यादवच्या जागी टी नटराजनचे नाव चर्चेत होते, परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटचा पुरेसा अनुभव नसल्यानं त्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळाले नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतानं मागील ४३ वर्षांत सिडनीत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. भारतानं १९७८ मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियावर एकमेव विजय मिळवला. बिशन सिंह बेदी यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं हा विजय मिळवला होता.  विषेश म्हणजे तोही सामना ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १९७८मध्ये भारतानं एक डाव व २ धावांनी बाजी मारली होती. १८८२मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या सामन्यापासून सिडनीवर कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. भारतानं १९४७मध्ये पहिला कसोटी सामना येथे खेळला आणि तो अनिर्णीत सुटला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरोहित शर्मा