ठळक मुद्देस्टीव्ह स्मिथचे कसोटी क्रिकेटमधील 27 वे शतक, भारताविरुद्धचे आठवेऑस्ट्रेलिया तीनशे धावांच्या उंबरठ्यावर
India vs Australia, 3rd Test, Day 2 : सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र टीम इंडियाच्या नावावर राहिले. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यांनी ऑस्ट्रेलियाचा धक्के दिले. लंच ब्रेकपर्यंत निम्मा संघ माघारी पाठवला होता. पण, सूर गवसलेला स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) खंबीरपणे उभा राहिला आणि शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली.
पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाला पहिल्या दिवसअखेर २ बाद १६६ करून दिल्या. पुकोव्हस्कीनं ११० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ६२ धावा केल्या. त्यानं लाबुशेनसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसाचा खेळ झाला. त्यानंतर लाबुशेन व स्मिथ या जोडीनंही शतकी भागीदारी केली. लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावर होता आणि अजिंक्यन जडेजाला पाचारण केलं. जडेजाच्या फिरकीवर लाबुशेन फसला आणि अजिंक्यनं स्लिपमध्ये शार्प कॅच टिपला. लाबुशेन १९६ चेंडूंत ११ चौकारांसह ९१ धावांवर माघारी परतला.
पहिल्या दोन सामन्यांत सलामीला खेळणारा मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जडेजानं त्यालाही जाळ्यात अडकवलं आणि जसप्रीत बुमराह करवी झेलबाद करून माघारी पाठवलं. त्यानंतर बुमराहनं कॅमेरून ग्रीनला भोपळ्यावर बाद केले. बुमराहनं ऑसी कर्णधार टीम पेनचा ( १) त्रिफळा उडवला. पण, आत्मविश्वास उंचावलेल्या स्मिथनं खिंड लढवली. त्यानं २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. घऱच्या मैदानावरील त्याचे हे १४ वे शतक असून २०१७ नंतरचे पहिलेच.. डिसेंबर २०१७मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत घरच्या मैदानावर अखेरचे शतक झळकावले होते.
भारताविरुद्ध त्याचे हे आठवे शतक ठरले आणि यासह त्यानं रिकी पाँटिंग, विव रिचर्ड्स, गॅरी सोबर्स यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकांच्या यादीत स्मिथ सहाव्या क्रमांकावर आहे. त्यान अॅलन बॉर्डर यांच्या २७ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. रिकी पाँटिंग ४० शतकांसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर स्टीव्ह वॉ ( ३२), मॅथ्यू हेडन ( ३०), डॉन ब्रँडमन ( २९), मिचेल क्लार्क ( २८) यांचा क्रमांक येतो.
Web Title: India vs Australia, 3rd Test : Steve Smith completes a superb century, first hundred for Australia in the series, Reaching his 27th Test ton
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.