Join us  

India vs Australia, 3rd Test : ड्रॉ नाही, हा तर विजयच; आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर, वीरूकडून टीम इंडियाचं कौतुक

India vs Australia, 3rd Test Day 5 : डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्या संयमाची त्याला साथ मिळाली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 11, 2021 1:33 PM

Open in App
ठळक मुद्दे१९७९च्या दिल्ली कसोटीनंतर टीम इंडिया प्रथमच चौथ्या डावात १३१ षटकं खेळली१५ जानेवारीपासून चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार

India vs Australia, 3rd Test Day 5 :  ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित अर्धशतक करून माघारी परतला. पाचव्या दिवशी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्यावरच भिस्त होती. रवींद्र जडेजा, रिषभ पंत दुखापतग्रस्त, त्यात हनुमा विहारीच्या फॉर्मचा काही नेम नाही. अशात अजिंक्य व पुजारा हेच टीम इंडियाचे तारणहार होते. पण, अजिंक्य सकाळच्या सत्रात बाद झाला अन् ऑस्ट्रेलियाला वाटलं विजय आपलाच. त्यांच्या या स्वप्नावर आर अश्विन ( R Ashwin) आणि हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांनी पाणी फिरवलं. सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं. 

डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्या संयमाची त्याला साथ मिळाली. मांडीचे स्नायू ताणल्यानंतर धाव घेण्यासाठी संघर्ष करणारा हनुमा विहारी सहाव्या विकेटसाठी आर अश्विनसह खेळपट्टीवर नांगर रोवून राहिला. विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मानं ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शुबमन गिल ३१ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाले. पुजारानं २०५ चेंडूंत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. रिषभ पंतनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या.   

१९७९च्या दिल्ली कसोटीनंतर टीम इंडिया प्रथमच चौथ्या डावात १३१ षटकं खेळली. सिडनी कसोटीत भारतानं १३१ षटकांत ५ बाद ३३४ धावा करून सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच आहे आणि १५ जानेवारीपासून चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. 

भारताच्या या कामगिरीचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी कौतुक केलं. महिंद्रा म्हणाले, हा सामना ड्रॉ झालेला नाही, तर हा टीम इंडियाचा विजयच आहे. अडथळ्यांसमोर टीम इंडियानं अभेद्य भींतच उभी केली होती. ब्राव्हो टीम!  वीरेंद्र सेहवागनं एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात स्टीव्ह स्मिथ रिषभ पंतच्या गार्ड मार्क खोडताना दिसत आहे. त्यावरून सेहवाग म्हणाला,''स्मिथची उद्योग कामी आले नाही. खाया पिया कुछ नई, ग्लास तोडा बाराना. भारतीय संघाचा मला अभिमान वाटतो. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनरिषभ पंतरोहित शर्माचेतेश्वर पुजारा