Join us  

India vs Australia, 3rd Test : चिते की चाल, बाझ की नजर और जडेजा का थ्रो...; सर जडेजानं ऑस्ट्रेलियाला दणाणून सोडलं, Video 

India vs Australia, 3rd Test : पहिल्या दिवशी जडेजाला केवळ तीनच षटकं दिल्यानं अजिंक्यवर टीकाही झाली. पण, अजिंक्यनं दुसऱ्या दिवसासाठी जडेजाला राखून ठेवले होते आणि त्याचे फळ मिळाले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 08, 2021 9:49 AM

Open in App
ठळक मुद्देरवींद्र जडेजानं घेतल्या सर्वाधिक ४ विकेट्स, बुमराह व नवदीप सैनी यांना प्रत्येकी दो विकेट्स स्टीव्ह स्मिथच्या १३१ धावानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३३८ धावांत तंबूत

India vs Australia, 3rd Test, Day 2 : रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यानं गोलंदाजीत कमाल दाखवताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्याच, शिवाय क्षेत्ररक्षणातही अमुल्य योगदान देताना टीम इंडियाला फ्रंट सिटवर बसवले. विल पुकोव्हस्की, मार्नस लाबुशेन यांच्या अर्धशतकानंतर स्टीव्ह स्मिथनं ( Steven Smith) शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला मोठ्या आघाडीकडे वाटचाल करून दिली होती. पण, कर्णधार अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना जडेजानं महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. टीम इंडियासाठी डोईजड होऊ पाहणाऱ्या स्मिथला त्यानं अचूक थ्रो करून माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.   

पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाला पहिल्या दिवसअखेर २ बाद १६६ करून दिल्या. पहिल्या दिवशी जडेजाला केवळ तीनच षटकं दिल्यानं अजिंक्यवर टीकाही झाली. पण, अजिंक्यनं दुसऱ्या दिवसासाठी जडेजाला राखून ठेवले होते आणि त्याचे फळ मिळाले. जडेजा-अजिंक्य जोडीनं शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या लाबुशेनला ९१ धावांवर माघारी पाठवले. मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स व नॅथन लियॉन यांनाही जडेजानं माघारी पाठवून टीम इंडियाचं टेंशन हलकं केलं. 

आत्मविश्वास उंचावलेल्या स्मिथनं खिंड लढवली. त्यानं २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. घऱच्या मैदानावरील त्याचे हे १४ वे शतक असून २०१७ नंतरचे पहिलेच.. डिसेंबर २०१७मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत घरच्या मैदानावर अखेरचे शतक झळकावले होते. तळाच्या फलंदाजांना फार योगदान देता आले नाही. तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन स्मिथ फटकेबाजी करत होता, परंतु त्यालाही जडेजानं घरचा रस्ता दाखवला. दुसरी धाव घेण्यासाठी धावलेल्या स्मिथला जडेजानं अचूक थ्रो करून धावबाद केलं. स्मिथला १३१ धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३३८ धावांवर तंबूत परतला. जडेजानं ६२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बुमराह व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दो विकेट्स घेतल्या.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजास्टीव्हन स्मिथ