Join us  

India vs Australia 3rd ODI : रवी शास्त्रींना मिळाला महागुरू; चहलने मोडला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम 

India vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यात बाकावर बसलेल्या युजवेंद्र चहलने तिसऱ्या सामन्यात कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 12:08 PM

Open in App
ठळक मुद्देयुजवेंद्र चहलची कमाल, ऑस्ट्रेलियाच्या 6 फलंदाजांना केले बादऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात सहा विकेट घेणारा भारताचा पहिला फिरकीटपटू

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यात बाकावर बसलेल्या युजवेंद्र चहलने तिसऱ्या सामन्यात कमाल केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवताना मेलबर्नवर विक्रमांची रांग लावली. चहलने 10 षटकांत 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि मेलबर्नवर भारतीय गोलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याशिवाय त्याने अजित आगरकरच्या ( 6/42) विक्रमाचीही बरोबरी केली. पण, या पलिकडे त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावावर असलेला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.चहलला पहिल्या दोन वन डे सामन्यात संधी देण्यात आली नव्हती, परंतु मेलबर्नच्या खेळपट्टीचा अंदाज घेत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले. चहलने एका षटकात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श ही सेट जोडी फोडली. त्याने एकाच षटकात या दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर त्याने पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, झाय रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांना बाद केले. या कामगिरीसह त्याने आगरकच्या विक्रमाची बरोबरी केली. आगरकरने 2004 मध्ये मेलबर्नवरच 42 धावांत 6 फलंदाज बाद केले होते आणि चहलने 2019 मध्ये 42 धावांत 6 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेत सहा विकेट घेणारा चहल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला.  मुरली कार्तिकने 2007 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 27 अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 2004 मध्ये आगरकरने ( 6/42) आणि आज चहलने ( 6/42) यांनी अशी कामगिरी केली. वन डे आणि ट्वेंटी -20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा विकेट घेणारा चहल हा श्रीलंकेच्या अजंटा मेंडिसनंतरचा दुसरा गोलंदाज आहे. 

ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. रिचर्डसनची विकेट घेत त्याने रवी शास्त्रींच्या विक्रमाची बरोबरी केली. 1991 मध्ये शास्त्रींनी पाच विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेणारे ते पहिले भारतीय फिरकीपटू होते. त्यानंतर हा पराक्रम चहलने केला. मात्र, 27 वर्षांनंतर शास्त्रींच्या विक्रमाशी बरोबरी करण्यावर चहलने समाधान मानले नाही. त्याने आणखी एक विकेट घेत शास्त्रींना मागे टाकले.  

टॅग्स :युजवेंद्र चहलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवी शास्त्री