Join us  

India vs Australia 3rd ODI : भुवनेश्वर कुमारचा 'तो' अफलातून कॅच पाहिलात का?

India vs Australia 3rd ODI: भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षणातही आपली छाप सोडताना भारताला यश मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 11:20 AM

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षणातही आपली छाप सोडताना भारताला यश मिळवून दिले. त्याने अवघ्या 27 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. त्याच्या या यशानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही ऑसींना धक्के दिले. चहलने तीन फलंदाज बाद करून ऑसींची मधली फळी अपयशी ठरवली. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 123 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल फटकेबाजी करत होता, परंतु मोहम्मद शमीने त्याचा अडथळा दूर केला. भुवीने टिपलेला तो झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाजी मारुन दौऱ्याचा ऐतिहासिक शेवट करण्याच्या निर्धारानं सज्ज झाला आहे. भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. असाच विक्रम एकदिवसीय मालिकेत घडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. भारतानं ऑस्ट्रेलियात कधीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. १९८५ मध्ये विश्व चॅम्पियनशिप तसेच २००८ मध्ये सीबी मालिका जिंकली होती. मागच्यावेळी २०१६ मध्ये भारताला येथे एकदिवसीय मालिका १-४ अशी गमवावी लागली. भारतानं आजचा सामना जिंकल्यास २०१८-१९ च्या दौऱ्यात एकही मालिका न गमावण्याचा विक्रम भारताच्या नावावर जमा होईल.

इतिहास घडवण्याच्या दिशेनं भारतीय संघानं पाऊल टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या धावांना लगाम लावताना भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. भुवीने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अफलातून कामगिरी करताना शुक्रवारचा दिवस गाजवला.पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :भुवनेश्वर कुमारभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय