Join us  

India vs Australia 3rd ODI : मेलबर्नचा इतिहास भारतासाठी पोषक की मारक; पाहा आकडेवारी 

India vs Australia 3rd ODI: मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 8:49 AM

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांनी भारताला वन डे मालिकेत कमबॅक करून दिले. ॲडलेडवर विजय मिळवून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पण, मेलबर्नचा इतिहास भारताच्या बाजूने की विरोधात हे जाणून घेवूया... 

4 : मेलबर्नवर मागील पाच सामन्यांत चारवेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. 5 : भारताला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14पैकी 5 सामने जिंकता आलेले आहेत. 2008 मध्ये भारतीय संघाने येथे अखेरचा वन डे सामना जिंकला होता. 0 : भारताला ऑस्ट्रेलियात द्विदेशीय वन डे मालिका एकदाही जिंकता आलेली नाही. 28: मेलबर्नवर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर करण्यासाठी रोहित शर्माला केवळ 28 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत हा विक्रम कृष्णम्माचारी श्रीकांत ( 368 ) यांच्या नावावर आहे. 92: रोहित व शिखर धवन या जोडीला ऑस्ट्रेलियात 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 92 धावा हव्या आहेत. असे करणारी ही पहिली भारतीय आणि एकूण चौथी जोडी ठरेल. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीबीसीसीआय