Join us  

IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा झेल वादात, नेटीझन्सकडून पाँटिंग टार्गेट

India vs Australia 2nd Test: भारतीय कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 10:25 AM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीची खेळी 123 धावांवर संपुष्टातहॅण्ड्सकोम्बने टिपलेला झेल वादातरिकी पाँटिंगकडून निर्णयाचे समर्थन

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगालच समाचार घेतला. त्याची ही खेळी 123 धावांवर संपुष्टात आली. कोहलीने 257 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 123 धावा केल्या. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 93व्या षटकात पीटर हॅण्ड्सकोम्बने झेल टिपून कोहलीची खेळी संपुष्टात आणली. मात्र, हॅण्ड्सकोम्बने टिपलेला तो झेल वादात अडकला आहे. 

मैदानावरील पंचाने बाद देताच 30 वर्षीय कोहलीने DRS मागितला आणि त्यात चेंडू हॅण्ड्सकोम्बच्या हातात झेपावण्यापूर्वी जमिनीवर आदळल्याचे दिसत होते. मात्र, मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राखण्यात आल्याने कोहली नाराज झाला. पंचांच्या या निर्णयाचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने समर्थन केले. त्यावरून नेटिझन्सने त्याला चांगलेच धारेवर धरले. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय