India vs Australia, 2nd Test : विकेट गेली अन् स्टीव्ह स्मिथला कळलेही नाही, जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, Video

७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 28, 2020 12:14 PM2020-12-28T12:14:37+5:302020-12-28T12:14:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd Test : It just clips the bail and Steven Smith's poor series continues! Australia 99/6, Video | India vs Australia, 2nd Test : विकेट गेली अन् स्टीव्ह स्मिथला कळलेही नाही, जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, Video

India vs Australia, 2nd Test : विकेट गेली अन् स्टीव्ह स्मिथला कळलेही नाही, जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली.  तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज ९९ धावांवर माघारी पाठवल्यानं टीम इंडियाची सामन्यावरील पकड मजबूत झाली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथची विकेट चर्चेचा विषय ठरली. 

७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स ( ४) यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बर्न्सनं या निर्णयाविरोधात DRS घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ८व्या षटकात उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले.  

भारतासाठी हा मोठा धक्का होता, परंतु अन्य गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. जसप्रीत बुमराहनं ऑसींना मोठा धक्का देताना स्टीव्हन स्मिथला ( ८) त्रिफळा उडवला. त्यानंतर वेड आणि ट्रॅव्हिस हेड यांची सेट होऊ पाहिलेली जोडी रवींद्र जडेजानं तोडली. जडेजानं वेडला ( ४० धावा) पायचीत केले. मोहम्मद सिराजनं ऑसीला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडला ( १७) बाद केले. जडेजानं ऑसी कर्णधार टीम पेनला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. 

पाहा व्हिडीओ..
 े

Web Title: India vs Australia, 2nd Test : It just clips the bail and Steven Smith's poor series continues! Australia 99/6, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.