Join us  

India vs Australia, 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी इतिहास घडविला; ऑस्ट्रेलियावर ३२ वर्षांनंतर ओढावली नामुष्की

India vs Australia, 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गुंडाळला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 29, 2020 7:48 AM

Open in App

India vs Australia, 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गुंडाळला. मोहम्मद सिराजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, आर अश्विनरवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादवनं एक बळी टिपला. या कामगिरीसह भारतीय गोलंदाजांनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इतिहास घडविला अन् ३२ वर्षांत ऑस्ट्रेलियावर प्रथमच अशी नामुष्की ओढावली 

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( ११२) शतकी आणि रवींद्र जडेजाच्या ५७ धावांच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात ३२६ धावा करून १३१ धावांची आघाडी घेतली. जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले. मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले.   

६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली. कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर मयांक अग्रवालच्या हाती झेल देऊन माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं त्याला चक्रव्युहात अडकवले.  मोहम्मद सिराजनं डोईजड झालेल्या कॅमेरून ग्रीनचा अडथळा दूर करून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पॅट कमिन्स आणि कॅमेरून ग्रीन या जोडीनं भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झुंजवले. पण, सकाळच्या सत्रात जसप्रीत बुमराहनं बाऊन्सरवर पॅट कमिन्सला ( २२) बाद केले. त्यानंतर सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. 

अजिंक्यनं सेट केलेल्या फिल्डींगमध्ये ग्रीन फसला अन् जडेजाच्या हाती झेल दिला. ग्रीननं १४६ चेंडूंत ४५ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं धक्कासत्र सुरूच ठेवले. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य आहे. १९८८नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावता आले नाही.

 

घरच्या मैदानावर संघाला कसोटीत एकाही फलंदाजांला अर्धशतक झळकावता आले नाहीवेस्ट इंडिज - २०१९ बांगलादेश - २०१८  श्रीलंका - २०१७  दक्षि आफ्रिका - २०१६भारत - २०१५ झिम्बाब्वे - २००५पाकिस्तान - २००२ ( UAE) न्यूझीलंड - २००२इंग्लंड - २०००ऑस्ट्रेलिया - १९८८  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहआर अश्विनरवींद्र जडेजा