India vs Australia, 2nd Test : DRSनं वाढवला गोंधळ, ऑसी खेळाडूंनी सुरू केलं सेलिब्रेशन अन्... Video 

India vs Australia, 2nd Test : भारतानं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २६ षटकांत ५४ धावा करून २ विकेट्स गमावल्या. 

By स्वदेश घाणेकर | Published: December 27, 2020 07:02 AM2020-12-27T07:02:51+5:302020-12-27T07:16:29+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd Test : First ball of the day and a review, But Cheteshwar Pujara survives, Video   | India vs Australia, 2nd Test : DRSनं वाढवला गोंधळ, ऑसी खेळाडूंनी सुरू केलं सेलिब्रेशन अन्... Video 

India vs Australia, 2nd Test : DRSनं वाढवला गोंधळ, ऑसी खेळाडूंनी सुरू केलं सेलिब्रेशन अन्... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 2nd Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल ( Shubhaman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाला सावरले. गिलनं काही सुरेख फटके मारून त्याची निवड सार्थ असल्याचे सिद्ध केले. त्यानं आक्रमक खेळावर अधिक भर दिला आणि त्यामुळे टीम इंडियाची धावांचा वेगही चांगला राहिला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑसी गोलंदाजांनी वेगवान मारा करताना गिल व पुजाराला चाचपडवले. दोघांना जीवदानही मिळाले. पण, अखेरीस पॅट कमिन्सनं त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी ऑसींनी DRS घेतला, परंतु तो अपयशी ठरला. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑसींना दिवसाचे पहिले यश मिळाले. ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा करणारा गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्याच पेननं पुजाराचे काही सोपे झेल सोडले. पण, त्याची भरपाई त्यानं अफलातून कॅच घेऊन केली. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूनं पुजाराच्या बॅटचे चुंबन घेतले आणि तो पहिल्या स्लीपच्या दिशेनं फिरला. पेननं चपळाईनं त्या दिशेनं झेप घेत भारताला धक्का दिला. पुजारा १७ धावांवर बाद झाला. 

पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियानं DRS घेतला. कमिन्सनं टाकलेला चेंडू पुजाराच्या बॅटला कट लागून पेनच्या हाती विसावला असा भास ऑसी खेळाडूंना झाला. अम्पायरनं त्याला नाबाद दिले अन् त्यांनी DRS घेतला. त्यात चेंडू हलकासा बॅटला लागला असे वाटताच ऑसी खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली, परंतु तिसऱ्या पंचांनी पुजाराला नाबाद देताच ते निराश झाले.



पाहा व्हिडीओ...

 

Web Title: India vs Australia, 2nd Test : First ball of the day and a review, But Cheteshwar Pujara survives, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.