Join us  

India vs Australia 2nd T20 : बुढ्ढा होगा तेरा... महेंद्रसिंग धोनी किती फिट आहे ते पाहा

धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 8:59 PM

Open in App

बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता म्हातारा झाला, अशी टीका काही जणांनी केली होती. पण धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. धोनीने या सामन्यात आपली विकेट वाचवण्यासाठी तब्बल 2.14 मी. आपले पाय स्ट्रेच केल्याचे पाहायला मिळाले.

धोनीचा षटकारांचा असा हा योगायोगबंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रिषभ पंत बाद झाला आणि धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात सहाव्या चेंडूवर धोनीने षटकार लगावला.

या सामन्यात धोनीच्या षटकारांचा अजब योगायोग पाहायला मिळाला. धोनीचा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील हा 50वा षटकार ठरला, तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 350वा सिक्सर ठरला. तेराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने मिडविकेटला षटकार लगावला.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया