Join us  

IND vs AUS Test : कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा यांना वगळल्याने नेटीझन्स नाराज

India vs Australia 1st Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 12 जणांचा भारतीय चमू जाहीर केला. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 12:15 PM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या कसोटीसाठी भारताचे अंतिम 12 शिलेदार जाहीररोहित शर्मा आणि हनुमा विहारी यांच्यात चुरससंघात आर अश्विनच्या रुपाने एकच फिरकीपटू

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 12 जणांचा भारतीय चमू जाहीर केला. अॅडलेड ओव्हल येथे गुरुवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. त्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 12 जणांच्या चमूत आर अश्विन या एकमेव फिरकीपटूला स्थान देण्यात आले आहे, तर जलद माऱ्याची जबाबदारी जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, या संघात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना स्थान देण्यात आलेले नाही. कुलदीप, जडेजा आणि भुवनेश्वर यांना स्थान न दिल्यामुळे नेटीझन्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि बीसीसीआयला थेट जाब विचारला आहे. 

अॅडलेडच्या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाजांना मदत मिळणार असल्याने  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकाच फिरकी गोलंदाजाला खेळवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात अश्विनवर दाखवलेला विश्वास ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही कायम आहे. त्यामुळे कुलदीप व जडेजा यांच्या आधी अश्विनला संघात प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, अश्विनची ऑस्ट्रेलियातील कामगिरी तितकी चांगली झालेली नाही. त्याने ऑस्ट्रेलियात 6 कसोटीत 21 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने कसोटी कारकिर्दीत 25.44 च्या सरासरीने 336 विकेट घेतल्या आहेत आणि या तुलनेत ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 

या सामन्यासाठी भारताने अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळाले नाही. हाही निर्णय नेटीझन्सच्या पचनी पडलेला नाही. संघातील एका जागेसाठी हनुमा विहारी आणि रोहित शर्मा यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयने पोस्ट केलेल्या खेळाडूंच्या नावांवर नेटीझन्सने व्यक्त केली नाराजी.  असे असतील संघभारत: विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा. ऑस्ट्रेलियाः मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभुवनेश्वर कुमारकुलदीप यादवरवींद्र जडेजा