India vs Australia, 1st Test : विराट कोहलीचा 'सुपर' झेल; ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, Video 

India vs Australia, 1st Test Day 2: भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: December 18, 2020 01:55 PM2020-12-18T13:55:53+5:302020-12-18T14:11:03+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 1st Test Day 2: Virat Kohli takes a brilliant catch to dismiss debutant Green, Watch Video | India vs Australia, 1st Test : विराट कोहलीचा 'सुपर' झेल; ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, Video 

India vs Australia, 1st Test : विराट कोहलीचा 'सुपर' झेल; ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी ऑसींना धक्के देताना त्यांचे चार फलंदाज अवघ्या ६५ धावांत माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथला बाद करून अश्विननं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यापाठोपाठ त्यानं ट्रॅव्हीस हेड व कॅमेरून ग्रीनला बाद केले. कर्णधार कोहलीनं अप्रतिम झेल घेत पदार्पणवीर ग्रीनला माघारी जाण्यास भाग पाडले. 

टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे वगळता अन्य फलंदाजांनी ऑसी गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पुजारासह अर्धशतकी भागीदारीनंतर कोहलीनं चौथ्या विकेटसाठी रहाणेसह सॉलीड भागीदारी केली. पण, रहाणेच्या चुकीच्या कॉलनं कोहली धावबाद झाला अन् टीम इंडियाचा डाव गडगडला. पहिल्या दिवसाच्या धावसंख्ये अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. कोहलीच्या विकेटसह टीम इंडियाचे ७ फलंदाज ५६ धावांवर माघारी परतले. पुजारा ( ४३), विराट ( ७४) आणि रहाणे ( ४२ ) यांनी दमदार कामगिरी केली. 

भारतानं पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. आज अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने तीन आणि जोश हेझलवूड व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं धक्के दिले. मॅथ्यू वेड ( ८) व जो बर्न्स ( ८) यांना बुमराहनं पायचीत केलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांचे झेल सोडले. लाबुशेन व स्मिथ ही जोडी डोईजड होईल असे वाटत असताना विराटनं चेंडू आर अश्विनच्या ( R Ashwin) हाती सोपलला आणि त्यानं यश मिळवून दिलं. अश्विननं सुरुवातीला स्मिथला ( १) स्लीपमध्ये झेलबाद केलं, त्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीवर ट्रॅव्हीस हेडचा ( ७) झेल टिपला. 


Web Title: India vs Australia, 1st Test Day 2: Virat Kohli takes a brilliant catch to dismiss debutant Green, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.