Join us  

India vs Australia, 1st Test : Big Wicket; कॅमेरून ग्रीननं दाखवला विराट कोहलीला 'रेड' सिग्नल; टीम इंडिया ६ बाद १९, Video

India vs Australia, 1st Test, 3rd Day : १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघानं सह धावांत चार विकेट्स गमावल्या. 

By स्वदेश घाणेकर | Published: December 19, 2020 10:22 AM

Open in App

India vs Australia, 1st Test, 3rd Day : तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना टीम इंडियाला एकामागून एक धक्के दिले. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या जसप्रीत बुमराहचा अडथचा दूर केल्यानंतर पॅट कमिन्सनं चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद केले. त्यानंतर जोश हेझलवूडनं एकाच षटकात दोन धक्के देताना टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी केली. १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघानं सह धावांत चार विकेट्स गमावल्या. 

भारतीय संघाचा पहिला डाव कांगारूंनी २४४ धावांवर संपवला. प्रत्युत्तरात ऑसी खेळाडूंची देहबोली पाहता, ते सामन्यावर वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. मात्र, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि उमेश यादव यांनी ऑसींना धक्के दिले. आर अश्विनला हलक्यात घेणं ऑस्ट्रेलियाला महागात पडले. अश्विननं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मार्नस लाबुशेनने खेळपट्टीवर चांगलाच जम बसविला. ११९ चेंडूंत ७ चौकारांसह ४७ धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली.  कर्णधार टीम पेननं ( Tim Pain) एकाकी खिंड लढवताना अर्धशतकी खेळी केली. पेन ९९ चेंडूंत १० चौकारांसह ७३ धावांवर नाबाद राहिला. उमेश यादवने तीन, तर जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. त्यात जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या क्रमांकावर येताना भक्कम बचावात्मक खेळ केला. तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पहिल्या डावात टीम इंडिला सावरणारा चेतेश्वर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूंन त्याला बाद केले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं मयांक ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( ०) यांना बाद करून टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. पॅट कमिन्सनं पुढच्या षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीननं अविश्वसनीय झेल घेताना विराटला चलते केले. टीम इंडियाची अवस्था ६ बाद १९ अशी झाली.

पाहा कॅच

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीमयांक अग्रवालपृथ्वी शॉचेतेश्वर पुजाराजसप्रित बुमराह