रोहित शर्माने 'विराट' विक्रम मोडला, पण अम्पायरवर पुन्हा खवळला; जाणून घ्या का

रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी भारताचा डाव सावरला.. ४ बाद २२ वरून या दोघांनी शतकी भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 08:24 PM2024-01-17T20:24:36+5:302024-01-17T20:24:52+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma becomes the leading run getter as an Indian Men's captain in T20I history, Rohit Sharma unhappy with the umpire on the No Ball call. | रोहित शर्माने 'विराट' विक्रम मोडला, पण अम्पायरवर पुन्हा खवळला; जाणून घ्या का

रोहित शर्माने 'विराट' विक्रम मोडला, पण अम्पायरवर पुन्हा खवळला; जाणून घ्या का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Afghanistan T20I Live   ( Marathi News ) - रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी भारताचा डाव सावरला.. ४ बाद २२ वरून या दोघांनी शतकी भागीदारी केली. पण, या सामन्यात रोहित अम्पायर विरेंदर सिंग यांच्यावर संतापलेला दिसला. रोहितने अर्धशतकी खेळी करून विराट कोहलीचा मोठा विक्रम आज मोडला. भारतीय कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त सर्वाधिक १५७० धावांचा विराटचा विक्रम आज रोहितने मोडला. शिवाय त्याने कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त  १३ वेळा फिफ्टी प्लस धावा करून विराटशी बरोबरी केली. 

Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगाशी आल्याचे दिसले. यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०) हे सलग दोन चेंडूंवर माघारी परतले. मागील दोन सामन्यांत अर्धशतक झळकाणारा शिवम दुबे ( १) आज अपयशी ठरला. संजू सॅमसनला आज संधी होती, पंरतु तो पुन्हा अपयशी झाला. अहमदने त्याच्या तिसऱ्या षटकात संजूला गोल्डन डकवर झेलबाद केले. बिनबाद १८ वरून भारताचा डाव ४ बाद २२ असा गडगडला.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम विराटने आज नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तो पाचव्यांदा शून्यावर बाद झाला, परंतु गोल्डन डकवर माघारी जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे.  


रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने मैदानावर उभा राहिला आणि रिंकू सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली. कैस अहमदच्या फिरकीवर रिंकूसाठी पायचीतची अपील झाली. मैदानावरील अम्पायरने त्याला बाद दिले, पंरतु लगेच DRS घेतला गेला. यात बॅट व चेंडू यांच्यात संपर्क झाल्याचे अल्ट्राएजमध्ये दिसले, पण चेंडू व बॅट यांच्यात थोडे अंतर असल्याचे दिसत असूनही अल्ट्राएज दिसल्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले. भारताला पहिल्या १० षटकांत ४ बाद ६१ धावा करता आल्या. रोहित-रिंकू जोडीने ४४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहितने १२व्या षटकात हात मोकळे करताना दोन खणखणीत षटकार खेचले. रोहितनेही ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

Image

१४व्या षटकात मोहम्मद सलीमने बिमर टाकला आणि रोहितने १ धावेसाठी तो टोलवला. त्यानंतर त्याने अम्पायर विरेंदर शर्माला नो बॉल नाही का असा सवाल केला. अम्पायरने नो बॉल न दिल्याने हिटमॅन संतापलेला दिसला आणि प्रेक्षकांनीही अम्पायरचा निषेध नोंदवला. 
 

Web Title: India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma becomes the leading run getter as an Indian Men's captain in T20I history, Rohit Sharma unhappy with the umpire on the No Ball call.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.