Join us  

India Tour of Sri Lanka : इंग्लंडचा संपूर्ण संघ विलगिकरणात अन् आता श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर 

India Tour of Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्यावरील मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. बुधवारी पहिला वन डे सामना खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 2:26 PM

Open in App

India Tour of Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्यावरील मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. बुधवारी पहिला वन डे सामना खेळवला जाणार आहे. पण, तत्पूर्वी या मालिकेवरही कोरोना संकट आलं आहे. टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पण, इंग्लंडच्या त्या संघातील तीन खेळाडू व ४ सदस्यांना कोरोना झाला आणि संपूर्ण संघ विलगिकरणात गेला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना मायदेशात परतल्यानंतर विलगिकरणात जावे लागले. त्यांचा कोरोना रिपोर्ट समोर आला आहे. श्रीलंकेच्या सर्व सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु त्यांना अजुनही विलगिकरणात रहावे लागणार आहे. ( Even as all the members of the Sri Lankan contingent tested negative for the coronavirus) 

मंगळवारी हे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य लंडनहून परतले. त्यांची RT-PCR टेस्ट करण्यात आली आणि त्यांना विलगिकरणात ठेवले आहे. कोलंबो हॉटेलमध्ये ते सात दिवस विलगिकरणात राहणार आहेत. ''लंडनहून परतलेल्या सदस्यांपैकी एकाही खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही,''असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्व्हा यांनी सांगितले. 

''लंडनहून परतल्यानंतर पहिले तीन दिवस सर्व सदस्य कठोर क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. चौथ्या दिवसानंतर ते जिम आणि स्वीमींग पूलचा वापर करू शकतील. हॉटेलमध्ये ते सरावही करू शकतील. सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर ते मैदानावर सरावाला जाऊ शकतात,''असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकाऱ्यानं सांगितले. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी १२ जुलैला संपुष्टात येणार आहे आणि १३ जुलैला पहिला कसोटी खेळला जाणार आहे.   

स्पर्धेचे वेळापत्रकवन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबोट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीयानेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाइंग्लंडकोरोना वायरस बातम्या