Join us  

India Tour of Sri Lanka: भुवनेश्वर कुमारच्या संघाची शिखर धवनच्या संघावर मात, मनीष पांडे व सूर्यकुमार यादवची फटकेबाजी

India Tour of Sri Lanka: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दाखल झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 12:18 PM

Open in App

India Tour of Sri Lanka: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दाखल झाली आहे. १३ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी आपापसात सराव सामना खेळला आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार याच्या संघानं गब्बरच्या संघावर मात केली. ट्वेंटी-२० सामन्यात मनीष पांडे व सूर्यकुमार यादव यांची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. शिखर धवनच्या संघानं ठेवलेले १५५ धावांचे लक्ष्य भुवीच्या संघानं १७ षटकांत पार केले. 

इंट्रा स्क्वॉड संघात धवनच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाडनं सलामीला येताना चांगली सुरुवात केली. त्यानं ३०+ धावा केल्या. धवनच्या संघाकडून मनीष पांडेनं सर्वाधिक ६३ धावा चोपल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर धवनच्या संघानं १५४ धावा केल्या.  

भुवनेश्वर कुमारच्या संघाकडून सूर्यकुमार यादवनं अर्धशतक झळकावलं. त्यांनी अगदी सहज हे लक्ष्य पार केले. पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली.

  

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीयानेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग स्पर्धेचे वेळापत्रक

वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो

ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनभुवनेश्वर कुमार