Join us  

India Tour to England : भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील वेळापत्रकात महत्त्वाचा बदल, ECB ने बीसीसीआयची विनंती ऐकली

India Tour to England : इंडियन प्रमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 6:00 PM

Open in App

India Tour to England : इंडियन प्रमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयर्लंड व इंग्लंड असेही दौरे आहेत. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि महत्त्वाची इंग्लंड मालिका लक्षात घेता सीनियर खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी BCCI घेत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताची बी टीम खेळण्याची शक्यता अधिक आहे. अशात इंग्लंड दौऱ्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. भारतीय संघ १६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंचा सराव व्हावा यासाठी सराव सामन्यांच्या आयोजनाची विनंती BCCI ने इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडे ( ECB ) केली होती. 

ECBने ही विनंती मान्य केली असून २४ ते २७ जून या कालावधीत भारतीय संघ विरुद्ध लेइसेस्टरशायक कौंटी क्रिकेट टीम यांच्यात चार दिवसांचा सराव सामना खेळवण्यात येणार आहे. या दोऱ्यावर भारतीय संघ एकाच वेळी आयर्लंड येथेही मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. २६ व २८ जून रोजी भारत-आयर्लंड यांच्यात ट्वेंटी-२० सामने होतील.  

भारत-आयर्लंड ट्वेंटी-२० मालिका

२६ जून - पहिली ट्वेंटी-२०२८ जून - दुसरी ट्वेंटी-२०  

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून  भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै  पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन ट्वेंटी-२० मालिका 

पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिजवन डे मालिका 

पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माबीसीसीआयइंग्लंडबेन स्टोक्स
Open in App