Join us  

India Tour of Australia : टीम इंडियाच्या 'या' शिलेदारासाठी पहिल्या कसोटी सामन्याच्या तिकिटांची मागणी वाढली

मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर यंदाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

By स्वदेश घाणेकर | Published: November 14, 2020 3:43 PM

Open in App

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका ही नेहमीच चाहत्यांच्या पसंतीत उतरणारी गोष्ट... ऑसी खेळाडूंची स्लेजिंग अन् भारतीय खेळाडूंचं त्यात तोडीचं उत्तर, यांनी नेहमीच चर्चेला विषय दिला. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या या दौऱ्यावर भारतीय संघाकडून सर्वांना प्रचंड अपेक्षा आहेत. त्यात तर सर्वांना कसोटी मालिकेची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच टीम इंडियाच्या एका खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पाहण्यासाठी पहिल्या कसोटीच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे. 

आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करने सर्वांना अचंबित करणाऱ्या टी नटराजनचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती दिली असली तरी कसोटी संघात त्याच्या समावेशानं टीम इंडिया मजबूत झाली आहे. कारण, कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतणार आहे. त्यामुळे 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणाऱ्या डे नाईट कसोटी सामन्याच्या तिकिटांची मागणी प्रचंड वाढली आहे. 

मेलबर्न येथील अंगद सिंह ओबेरॉय हे टीम इंडियाला देणारा स्वामी ग्रुप चालवतात. त्यांनी ग्रुपमध्ये पहिल्या सामन्याची तिकीटांची मागणी वाढल्याचे ते म्हणाले. ''डे नाईट सामन्यासाठी आमच्याकडे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पहिला कसोटी सामना पाहण्यासाठी 25 हजार हून अधिक लोक येण्याची शक्यता आहे,''असे ओबेरॉय यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले. या सामन्यात 27 हजार प्रेक्षकांना येण्याची परवानगी दिली आहे. अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं घेतली सुट्टी; नेटकऱ्यांनी आठवण करून दिला महेंद्रसिंग धोनीचा त्याग...

सुधारित संघ ( Revised Team For Australia Tour )ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्मा