रणजी करंडक जिंकल्यानंतर भारतीय स्टार खेळाडूची निवृत्ती; रोहित म्हणाला, मुंबईचा योद्धा

अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि या विजयासह मुंबईचा अनुभवी खेळाडू निवृत्त झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 04:51 PM2024-03-14T16:51:04+5:302024-03-14T16:55:44+5:30

whatsapp join usJoin us
India star Dhawal Kulkarni announces retirement after winning Ranji Trophy 2024 title for Mumbai, says 'It's a dream to start and finish on a high', Rohit Sharma's Instagram story for Dhawal Kulkarni. | रणजी करंडक जिंकल्यानंतर भारतीय स्टार खेळाडूची निवृत्ती; रोहित म्हणाला, मुंबईचा योद्धा

रणजी करंडक जिंकल्यानंतर भारतीय स्टार खेळाडूची निवृत्ती; रोहित म्हणाला, मुंबईचा योद्धा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy 2024 Final, Dhawal Kulkarni Retire : मुंबई संघाने विक्रमी ४२व्यांदा रणजी करंडक जिंकला. अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि या विजयासह मुंबईचा अनुभवी खेळाडू निवृत्त झाला. स्टार गोलंदाज धवल कुलकर्णीने विजयासोबतच आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप दिला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे फायनलची शेवटची विकेट घेत कुलकर्णीने विदर्भाचा डाव गुंडाळला. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून धवलचा विशेष गौरव करण्यात आला. कुटुंबियांच्या उपस्थितीत क्रिकेटमधून निवृत्त होत असणारा धवल भावनिक झालेला पाहायला मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या खास मित्रासाठी, मुंबईचा योद्धा अशी पोस्ट लिहिली. 

रणजी करंडक फायनलच्या पाचव्या दिवसातील १३५ व्या षटकातील तिसरा चेंडू धवलच्या कारकिर्दीतील शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवर त्याने उमेश यादवला बोल्ड केले.  ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विदर्भाचा दुसरा डावा ३६८ धावांवर गडगडला. मुंबईकडून तनुष कोटियनने ४, तुषार देशपांडे व मुशीर खान यांनी प्रत्येकी २, तर शाम्स मुलानी व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. धवलने अंतिम फेरीत एकूण चार विकेट घेतल्या. या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने चार सामन्यांच्या ८ डावात एकूण ११ बळी घेतले. 


२००८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धवल कुलकर्णीच्या नावावर ९५ सामन्यांमध्ये २८१ बळी आहेत. शिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३०सामन्यांत २२३ विकेट्स आहेत. त्याने ८१  ट्वेंटी-२० सामन्यांत  टी-20 १५४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१४ ते २०१६ या कालावधीत भारतासाठी १२ वन डे व २ ट्वेंटी-२० सामने खेळले. त्याच्या नावावर १२ वन डे सामन्यांत १९ बळी व २ ट्वेंटी-२०त ३ बळी आहेत.

 

Web Title: India star Dhawal Kulkarni announces retirement after winning Ranji Trophy 2024 title for Mumbai, says 'It's a dream to start and finish on a high', Rohit Sharma's Instagram story for Dhawal Kulkarni.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.