KL Rahul ची पाचव्या कसोटीतून माघार; पदार्पण करणार आखणी एक नवा शिलेदार 

हैदराबाद कसोटी गमवाल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील ३ कसोटी जिंकल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:09 AM2024-02-29T10:09:26+5:302024-02-29T10:10:04+5:30

whatsapp join usJoin us
India squad for 5th Test vs England : Rajat Patidar to stay in squad as KL Rahul out, Devdutt Padikkal to make debut in Dharamsala | KL Rahul ची पाचव्या कसोटीतून माघार; पदार्पण करणार आखणी एक नवा शिलेदार 

KL Rahul ची पाचव्या कसोटीतून माघार; पदार्पण करणार आखणी एक नवा शिलेदार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test  ( Marathi News ) : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. हैदराबाद कसोटी गमवाल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील ३ कसोटी जिंकल्या. विराट कोहली, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा ( दुसऱ्या कसोटीत नव्हता) आदी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाने बॅझबॉलला झोडले. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल यांनी फलंदाजी कमाल केली, सर्फराज खान, रजत पाटीदार, आकाश दीप व ध्रुव जुरेल यांना या मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. रजत सोडल्यास अन्य तिन्ही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं. 


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवी कसोटी धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, त्याआधी लोकेश राहुल ( KL Rahul) याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेच. पहिल्या कसोटीनंतर दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या लोकेश राहुलच्या दुखापतीचं नेमकं कारण NCA च्या वैद्यकिय टीमला सापडले नाही. त्यामुळे लोकेश लंडनमध्ये जिथे त्याने शस्त्रक्रिया करून घेतली होती, त्या डॉक्टरांकडे गेला आहे. त्यामुळे तो पाचवी कसोटी खेळणे जवळपास अनिश्चित आहे. अशा परिस्थित पाचव्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा आणखी एका युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देऊ शकतो. देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal) याचे धर्मशाला कसोटीत पदार्पण निश्चित मानले जातेय.


रजत पाटीदारला तीन कसोटींत ३२, ९, ५, ०, १७ व ० अशाच धावा करता आल्या आहेत. बीसीसीआय त्याला रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या ( मध्यप्रदेश विरुद्ध विदर्भ) लढतीसाठी रिलीज करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवदत्त पडिक्कलला संधी मिळू शकते.''धर्मशाला कसोटीत पडिक्कलचे पदार्पण होईल. राहुल या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही आणि आयपीएलपूर्वी पडिक्कलचा कसोटीतील खेळ पाहण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाईम्सला सांगितले. 


२३ वर्षीय पडिक्कलने ३१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४४.५४ च्या सरासरीने २२२७ धावा केल्या आहेत. त्याने ६ शतकं व १२ अर्धशतकं झळकावली आहेत. रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या पर्वात त्याने ४ सामन्यांत ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. 
 

Web Title: India squad for 5th Test vs England : Rajat Patidar to stay in squad as KL Rahul out, Devdutt Padikkal to make debut in Dharamsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.