Join us  

'भारताला वर्ल्ड कप जिंकायचाय, तर महेंद्रसिंग धोनी संघात हवाच'

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 9:05 AM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे.यष्टिमागील धोनीच्या कामगिरीला अजूनही तोड नाही

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे. भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही धोनीचे महत्त्व सांगितले आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचे स्थान भक्कम असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारानेही भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर कॅप्टन कूल धोनी संघात हवाच, असे स्पष्ट मत व्यक्त केले. धोनीचा अनुभव हा कर्णधार विराट कोहलीला फायद्याचा ठरणार असल्याचेही संगकारा म्हणाला.

कुमार संगकारा" title="कुमार संगकारा"/>
कुमार संगकारा

वर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हाच भारतीय संघाचा पहिल्या क्रमांकाचा पर्याय आहे. 2018 मध्ये त्याच्या बॅटीतून धावांचा ओघ आटला होता. त्यामुळे दिनेश कार्तिक व रिषभ पंत या दोन पर्यायांना संधी देण्यात आली, परंतु त्यांना फार चमकदार कामगिरी करता आली नाही. कार्तिकला मॅच फिनिशरची भूमिका वठवता आली नाही, तर पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आपली ठसा उमटवला आणि मर्यादित षटकांत तो सातत्याने प्रगती करत आहे. 

असे असले तरी धोनीच्या अनुभवासमोर हे दोघेही अपयशी ठरतात. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीच्या याच अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होईल, असे ठाम मत संगकाराने व्यक्त केले. दडपणाच्या परिस्थितील कर्णधार कोहलीला शांत ठेवण्याचे काम धोनीच करू शकतो आणि संघाला योग्य मार्गदर्शन करून बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकण्याची क्षमता धोनीत आहे, असेही संगकारा म्हणाला. 

''वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत अनुभवच कामी येतो. धोनीचा अनुभवच नव्हे तर शांत डोक्यानं परिस्थिती हाताळण्याची त्याची कला भारतीय संघाच्या फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात त्याचे स्थान पक्केच असेल, असे मला वाटते. त्याशिवाय कोहलीला कठीण परिस्थितीत मार्गदर्शकाची आवश्यकता भासेल आणि ती उणीव धोनी भरून काढेल,'' असे संगकाराने सांगितले. 

2018 साली धोनीला 20 वन डे सामन्यांत एकाही अर्धशतकावीना 275 धावा करता आल्या. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, 37 वर्षीय धोनीनं 2019 मध्ये दणक्यात सुरुवात केली. त्याने ऑस्ट्रेलियात सलग तीन अर्धशतकं झळकावून सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याने टीकाकारांची तोंड बंद केली. 

रिषभ पंतला सल्ला

युवा यष्टिरक्षक रिषभ पंतचे कौतुक करताना संगकाराने त्याला एक सल्ला दिला. तो म्हणाला,'' रिषभ पंत हा भारतीय संघाला मिळालेला योग्य पर्याय आहे. त्यामुळे संघात एक स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याने या स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.'' 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीआयसीसी विश्वकप २०१९कुमार संगकाराविराट कोहलीरिषभ पंत