Join us

भारताला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला हवे : वीरेंद्र सेहवाग

कर्णधार संघाचा सर्वेसर्वा असला तरी अनेक बाबतींत त्याची भूमिका केवळ मत नोंदविणारी असते आणि त्यामुळे विराट कोहलीचा पाठिंबा असला तरी भारतीय संघाचे प्रशिक्षक होता आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:40 IST

Open in App

मेरठ : कर्णधार संघाचा सर्वेसर्वा असला तरी अनेक बाबतींत त्याची भूमिका केवळ मत नोंदविणारी असते आणि त्यामुळे विराट कोहलीचा पाठिंबा असला तरी भारतीय संघाचे प्रशिक्षक होता आले नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली.अनिल कुंबळेने कर्णधार कोहलीसोबतच्या अस्थिर संबंधांच्या कारणास्तव मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर सेहवागचा प्रशिक्षकपदाच्या दावेदारांमध्ये समावेश झाला होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण या तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. वर्षभरापूर्वी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत शास्त्री कुंबळेच्या तुलनेत पिछाडीवर पडले होते. संघाबाबत घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये कर्णधाराचा प्रभाव असतो; पण अनेक बाबतींत अंतिम निर्णय त्याचा नसतो, असे सेहवागने म्हटले आहे.येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेला सेहवाग म्हणाला, ‘प्रशिक्षक व संघनिवड यामध्ये कर्णधाराची भूमिका नेहमी सल्ला देणारी असते. सेहवागने केवळ एका वाक्यात प्रशिक्षकपदाचा अर्ज केला असल्याचे म्हटले जाते; पण कारकिर्दीत १०४ कसोटी व २५१ वन-डे खेळणाºया या आक्रमक फलंदाजाने हे वृत्त फेटाळले. सेहवाग म्हणाला, पाकिस्तान या शेजारी देशाविरुद्ध क्रिकेट खेळायला हवे; पण अंतिम निर्णय सरकारचा राहील. ‘याबाबत सरकारने निर्णय घ्यावा.’ सेहवाग सध्या क्रिकेट प्रशासनामध्ये येण्यास इच्छुक नाही.हिंदी समालोचनामध्ये तो वेगळी ओळख निर्माण करण्यास प्रयत्नशील आहे. भारतीय क्रिकेट व्यतिरिक्त अनेक खेळाडू असे आहेत की त्यांचा संघर्ष लोकांपुढे यायला पाहिजे. मल्ल सुशीलकुमारवर बायोपिक यायला हवा. त्याचा संघर्ष मी जवळून बघितला आहे.(वृत्तसंस्था)

टॅग्स :विरेंद्र सेहवाग