Join us  

भारताला पाहिजे चांगली सुरुवात

‘बॉक्सिंग डे’ कसोटी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमधील अधोरेखित घटना मानली जाते. संघ, खेळाडू आणि अधिकारी या घटनेकडे आशेने बघत असून एमसीजीवर ही कसोटी खेळली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 5:13 AM

Open in App

- सौरव गांगुली‘बॉक्सिंग डे’ कसोटी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमधील अधोरेखित घटना मानली जाते. संघ, खेळाडू आणि अधिकारी या घटनेकडे आशेने बघत असून एमसीजीवर ही कसोटी खेळली जाते. अ‍ॅडलेड आणि पर्थ कसोटीचा निकाल दोन्ही संघांच्या बाजूने लागल्यानंतर मेलबोर्न कसोटी मालिकेतील निकालासाठी निर्णायक ठरणार आहे. भारत-आॅस्ट्रेलिया कसोटीचा गाजावाजा होणार नाही, असे मुळीच नाही. सुरुवातीला कमकुवत वाटणाऱ्या आॅस्ट्रेलियाने दुसºया सामन्यात परतफेड करीत लक्ष वेधले. आता तिसºया सामन्यासाठी भारताने लढवय्या संघ निवडला आहे.भारतीय संघाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. परदेशातील मालिकेत दोन सामन्यानंतर संघात बदल करण्याचा निवडकर्त्यांनी नवा पायंडा सुरू केला. दौºयाच्या प्रारंभी सराव सामने नसतील तर ही कल्पना चांगली आहे काय, याबद्दल मी साशंक आहे. दौºयात मयांक अग्रवालसारख्या खेळाडूला एमसीजीच्या वेगळ्या खेळपट्टीवर खेळण्याची मोठी संधी असेल. येथे टेनिस बॉलसारखा चेंडू उसळी घेतो. नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेतो. पण अशावेळी लाभ होईलच हे सांगणे अवघड आहे.भारतीय सलामी जोडीवर तोडगा निघालेला दिसतो. हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांच्यापैकी एकाला सलामीला संधी दिली जाईल. मी रोहित असतो, तर संघ व्यवस्थापनाला सांगितले असते की मी सलामी करणारच. तो आत-बाहेर होत आला आहे. पण दमदार फटकेबाजीच्या बळावर खेळपट्टीवर राहिल्यास रोहित संघात स्थान बळकट करू शकतो. सेहवाग, जस्टिन लेंगर आणि मायकेल वॉन हे पूर्णवेळ सलामीवीर नव्हते पण त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. रोहितचेही असेच आहे. एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आणि कर्तृत्व या बळावर वेगळा प्रकार असलेल्या कसोटी क्रिकेटमध्येही तो स्थिरावू शकतो.रविचंद्रन अश्विन मोठ्या दौºयात नेहमी जखमी झाल्याने नियमित फिरकी गोलंदाज बनू शकला नाही. इंग्लंड, द. आफ्रिका आणि आता आॅस्ट्रेलिया दौºयात असेच घडले. संघाला त्याची डावखुºया फलंदाजांविरुद्ध गरज असते, पण सध्या तो देखील लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे.ही मालिका अजूनही समान स्थितीत आहे. भारत ही मालिका जिंकू शकतो, हे मी आधीही बोललो. आता देखील माझे हेच मत आहे. सामन्याची सुरुवात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खेळपट्टीवर गवत ठेवण्याचा आॅस्ट्रेलियाचा निर्णय त्यांच्यासाठी लाभदायी ठरू शकतो. उभय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरल्यामुळे नाणेफेकीचा कौलदेखील कुणाच्या पथ्यावर पडेल, असे वाटत नाही. (गेमप्लान) 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया