Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताने प्रत्येक क्षेत्रात आम्हाला मागे टाकले, किवी कर्णधार केन विलियम्सनची प्रतिक्रिया

भारताने प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना आम्हाला पिछाडीवर टाकले. तसेच, आमच्या क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुकांमुळे आम्हाला पराभवास सामोरे जावे लागले, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने म्हटले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:08 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताने प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना आम्हाला पिछाडीवर टाकले. तसेच, आमच्या क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुकांमुळे आम्हाला पराभवास सामोरे जावे लागले, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने म्हटले.बुधवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर विलियम्सन म्हणाला की, ‘तयारीनुसार विचार करता आमच्यासाठी परिस्थिती कठीण होती. पण, अनुभव पाहता आम्ही या पराभवामागे कोणतेही कारण देऊ शकत नाही. भारतात खेळताना नेहमी संध्याकाळी दव पडतात. मात्र, खेळाडूंना याचा अनुभव आहे. मी पराभवाचे कोणतेही कारण देऊ इच्छित नाही, कारण आम्ही खूप खराब खेळलो.’न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी सामन्यात तीन झेल सोडले. याविषयी विलियम्सन म्हणाला की, ‘आधीच सांगितल्याप्रमाणे आम्ही भारताच्या तुलनेत प्रत्येक क्षेत्रात मागे पडलो. यामध्ये क्षेत्ररक्षण निर्णायक ठरले. अनेकदा आमच्या क्षेत्ररक्षणाचा अभिमान असतो; परंतु टी-२० क्रिकेटमध्ये आम्हाला अधिक सुधारणा कराव्या लागतील. सुटलेले झेल अत्यंत निर्णायक ठरले. दोन्ही फलंदाजांनी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत मोठ्या खेळी केल्या.’ (वृत्तसंस्था)भुवनेश्वर व बुमराह दोघेही शानदार गोलंदाज आहेत. सामन्यात त्यांना चांगली सुरुवात मिळाली आणि आमच्या अडचणी वाढल्या. चेंडू स्विंग होत होता आणि खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना मदत मिळत होती. आम्हाला सावध भूमिका घेण्यास भाग पाडताना त्यांनी आमच्यावर दबाव टाकला.- केन विलियम्सन

टॅग्स :क्रिकेट