Join us

भारताची सलामी आॅस्ट्रेलियाविरुद्ध

तीन वेळचे चॅम्पियन भारत आणि आॅस्ट्रेलिया संघ १९ वर्षांखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषकात सलामीला एकमेकांविरुद्ध खेळतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 04:03 IST

Open in App

दुबई : तीन वेळचे चॅम्पियन भारत आणि आॅस्ट्रेलिया संघ १९ वर्षांखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषकात सलामीला एकमेकांविरुद्ध खेळतील. स्पर्धा पुढीलवर्षी १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होईल.भारत आणि आॅस्ट्रेलिया ब गटात असून याच गटात झिम्बाब्वे, पापुआ न्यू गिनी संघांचा समावेश आहे. १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचा गतविजेता वेस्ट इंडिजची सलामीला गाठ पडेल ती न्यूझीलंडविरुद्ध. ख्राईस्टचर्च, क्वीन्सटाऊन, टाऊरंगा आणि वांगारई येथे सामने खेळविले जातील. अ गटात विंडीजसह न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि केनियाचा समावेश आहे. क गटात बांगला देश, कॅनडा, इंग्लंड आणि नामिबिया तसेच ब गटात दोन वेळेचा चॅम्पियन पाकिस्तान, श्रीलंका, अफगानिस्तान व आयर्लंड संघ आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपरलीग खेळतील. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यासहएकूण २० सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. (वृत्तसंस्था)