Join us

इंडिया ओपन मुष्टियुद्ध : मेरी कोमला सुवर्णपदक

भारतीय स्टार बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आज येथे सुवर्णपदक जिंकले. मेरी कोमसह संजीत, मनिष कौशिक, पी. बासुमातर, लव्हलीना बोर्गाहेन, पिंकी राणी व मनिष यांनी सुवर्णपदक जिंकले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:20 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय स्टार बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आज येथे सुवर्णपदक जिंकले. मेरी कोमसह संजीत, मनिष कौशिक, पी. बासुमातर, लव्हलीना बोर्गाहेन, पिंकी राणी व मनिष यांनी सुवर्णपदक जिंकले.मेरी कोमने ४८ किलो वजन गटाच्या फायनलमध्ये फिलिपाईन्सच्या जोसी गाबुको हिचा ४-१ असा पराभव करताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.याआधी पिलाओ बसुमतारी हिने ६४ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. तिने माजी विश्व आणि आशियाई कास्यपदकप्राप्त थायलंडच्या सुदापोर्न सीसोंदी हिचा ३-२ असा पराभव केला. आसामच्या या खेळाडूने सर्बियात नेशन कप २०१५ चेही विजेतेपद पटकावले आहे. आसामची अन्य एक बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने वेल्टरवेट ६९ किलो वजन गटात पूजाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. एल. सरिता हिला ६० किलो वजन गटाच्या फायनलमध्ये फिनलँडच्या आॅलिम्पिक कास्यपदकप्राप्त मीरा पोटकेनोन हिच्याकडून पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सरिताने शानदार खेळ केल्यानंतरही लढत २-३ ने गमावली. पुरुष गटात संजित (९१ किलो) याने देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्याने उजबेकिस्तानच्या संजार तुर्सुनोव्हवर विजय मिळविला. शिव थापाला पराभूत करणाºया मनीषने अंतिम फेरीत न खेळताही सुवर्णपदक जिंकले. मनीषचा प्रतिस्पर्धी बाट्टूमूर मिशील्ट जखमी असल्याने अंतिम सामना खेळू शकला नाही.

टॅग्स :क्रीडाबॉक्सिंग