Join us  

केदार जाधवच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट, खेळणार का वर्ल्ड कप? 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे केदार जाधवने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आणि त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:26 PM

Open in App
ठळक मुद्देखांद्याच्या दुखापतीमुळे केदार जाधवला आयपीएलमधून माघार घ्यावी लागलीकिंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा खांदा दुखावलाभारताच्या वर्ल्ड कप संघात त्याचा समावेश आहे

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे केदार जाधवने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आणि त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. केदारची दुखापत वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत बरी न झाल्यास कोणाला संधी मिळेल, अशीही चर्चा आतापासून सुरू झाली आहे. पण, केदारबद्दल कोणताही निर्णय घेण्याची घाई करणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी स्पष्ट केले. केदारच्या दुखापतीबाबत निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

अष्टपैलू खेळाडू केदारला खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्याची घोषणा चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी केली होती. पण ही दुखापत गंभीर स्वरुपाची असेल तर विश्वचषकासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही ( आयसीसी)  केदारच्या दुखापतीची चिंता लागली आहे. केदार यातून सावरला नाही तर त्याच्या जागी कोणाची वर्णी लागेल याचीही उत्सुकता आयसीसीला लागली आहे. 

(ICC ला भारताची चिंता; केदार जाधवच्या जागी कोणाची वर्णी, याची उत्सुकता!)किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप स्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी जाधवने डाइव्ह मारली. केदारने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर केदारला झालेली दुखापत ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.  

पण, एमएसके प्रसाद यांनी गुरुवारी महत्त्वाचा खुलासा केला. 23 मे पर्यंत भारताच्या संभाव्य 15 जणांच्या चमूत बदल करता येऊ शकतो. तोपर्यंत केदारला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्याची दुखापत इतकी गंभीर नसून तो त्यातून सावरेल. त्यामुळे त्याच्या बदलीचा निर्णय घेताना घाई करणार नाही, असे प्रसाद यांच्याकडून सांगण्यात आले. भारतीय संघ 22 मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे आणि त्यांचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.

केदारच्या जागी कोणाला संधी?केदार दुखापतीतून न सावरल्यास त्याच्या जागी पाच खेळाडूंच्या नावांची चर्चा आहे. रिषभ पंत, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.  

टॅग्स :केदार जाधववर्ल्ड कप २०१९बीसीसीआयआयपीएल 2019