भारत ‘क’ देवधर चषकाचा मानकरी

सलामीवीर अजिंक्य रहाणे व यष्टिरक्षक इशान किशन यांच्या शतकाच्या जोरावर भारत ‘क’ने देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ला २९ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 10:45 PM2018-10-27T22:45:23+5:302018-10-27T22:45:50+5:30

whatsapp join usJoin us
India 'A' Deodhar Cup player honor | भारत ‘क’ देवधर चषकाचा मानकरी

भारत ‘क’ देवधर चषकाचा मानकरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सलामीवीर अजिंक्य रहाणे व यष्टिरक्षक इशान किशन यांच्या शतकाच्या जोरावर भारत ‘क’ने देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ला २९ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले.
नाणेफेक जिंकून प्रथम भारत ‘क’ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या षटकांत सूर्यकांत यादवने १८ चेंडूत ३९ धावा केल्या. भारत ‘क’ने निर्धारित ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३५२ धावा केल्या. जयदेव उनाडकटने ५२ धावा देऊन तीन, तर दीपक चहर व मयांक मार्कंडेय यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारत ‘क’चा कर्णधार श्रेयस अय्यर याने ११४ चेंडूत १४८ धावा केल्या. मात्र, त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अय्यर बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. ऋतुराज गायकवाड ६० व अंकुश बैस याने ३७ धावा केल्या. त्यांचा संघ ४६.१ षटकांत ३२३ धावांत बाद झाला. पप्पू राय याने तीन, तर गुरुबानी, नवदीप सैनी व विजय शंकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

Web Title: India 'A' Deodhar Cup player honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.