बेंगळुरू : मोहम्मद सिराज, रजनीश गुरबानी आणि नवदीप सैनी यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारतीय अ संघाने अनधिकृत कसोटीत द. आफ्रिकेला ८ बाद २४६ धावांपर्यत मर्यादित ठेवले. यजमान संघाचा यष्टिरक्षक- फलंदाज रुडी सेकेंड याचे शतक सहा धावांनी हुकले.
वेगवान गोलंदाज सिराजने ५६ धावांत तीन, रजनीशने ४७ धावांत दोन आणि सैनीने ४७ धावांत दोन गडी बाद केले. लेग स्पिनर युजवेंद्र चहल याला एक बळी मिळाला.सेकेंड ९४ तसेच सारेल इरवी ४७ धावा काढून बाद झाला.
अन्य फलंदाज उपयुक्त योगदान देण्यात अपयशी ठरले. पहिल्या दिवशी बाद झालेला अखेरचा फलंदाज सेकेंडने १३९ चेंडूत १२ चौकार ठोकले. सेकेंडने सेनुरान मुथ्युस्वामीसोबत पाचव्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी केली. ९३ धावांत चार गडी गमविणाऱ्या आफ्रिकेच्या धावसंख्येला सेकेंडने आकार दिला. (वृत्तसंस्था)